एटीएममधून नाही आले पण अकाऊंटमधून उडालेयत पैसे ?

बॅंकेकडे तक्रार केल्यास तुम्हाला ७ दिवसांच्या आत पैसे मिळणे बॅंकेला बांधिल आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2017, 07:06 PM IST
एटीएममधून नाही आले पण अकाऊंटमधून उडालेयत पैसे ? title=

मुंबई : पैशाची चणचण भासू लागल्यावर आपण एटीएमकडे धावतो. बऱ्याचदा अस होत की पिन नंबर वगैरे बरोबर असतो,अकाऊंटमधून रक्कम कमी झाल्याचा मेसेज येतो पण एटीएममधून पैसे येत नाहीत. असे झाल्यास काय करावे अशी माहिती जवळ कुठे लिहिलेली नसते, बाहेरच्या सिक्युरीटी गार्डलाही त्याबद्दल काही सांगता येत नाही. मग काय करावे असा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. यावेळी तुम्ही काय करू शकता याबद्दल जाणून घेऊया.

अशावेळी काय कराल ?

एटीएमशी संबंधित कोणत्याही अन्य समस्येसाठी, आपण प्रथम आपल्या स्वत: च्या बँकेमध्ये तक्रार नोंदवावी.
एका महिन्याने कोणती कार्यवाही न झाल्यास ओम्बडसमॅनकडे तक्रार दाखल करु शकता.
ग्राहक न्यायालयाची मदत घेऊ शकता.
फसवणूक करण्याच्या कुठल्याही बाबतीत आपण पोलिसांकडे जाऊ शकता.
पण यामध्ये फसवणूक होण्याचे चान्स फार कमी असतात. त्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईस बराच वेळही लागू शकतो.

रोज मिळतील शंभर रुपये 

बॅंकेकडे तक्रार केल्यास तुम्हाला ७ दिवसांच्या आत पैसे मिळणे बॅंकेला बांधिल आहे.  बॅकेने त्यापेक्षा जास्त वेळ घेतल्यास बँक दररोज १०० रुपयांचा दंड देईल.

इथे करा तक्रार

जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार देण्यासाठी, त्याच्या वेबसाइटवर भेट द्या. Ncdrc.nic.in.यावर तक्रार करु शकता