आधार कार्ड हरवलंय का? काळजी करू नका घरबसल्या सहज बनवा नवीन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. तुम्ही अतिशय सोप्या आणि जलद मार्गाने आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.

Updated: Jul 24, 2022, 08:26 PM IST
आधार कार्ड हरवलंय का? काळजी करू नका घरबसल्या सहज बनवा नवीन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया title=

Aadhar Card: भारतातील कोणत्याही नागरिकासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शाळेत प्रवेश असो वा बँकेत खाते उघडणे, ही कामे आधार कार्डशिवाय होऊ शकत नाहीत. प्रत्येक सेवा आणि सार्वजनिक ठिकाणी पडताळणीसाठी आधार आवश्यक आहे.त्यामुळे आधार कार्ड हरवल्यास तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. तुम्ही अतिशय सोप्या आणि जलद मार्गाने आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्डधारकांसाठी डिजिटल सेवा सुरू केली आहे.  तुम्ही तुमच्या अधिसूचित मोबाईल क्रमांकाने तुमचा UID क्रमांक आणि आधार कार्ड ऑनलाइन तपासू शकता.

सर्वप्रथम www.uidai.gov.in वरिल 'माय आधार विभाग' वर जा आणि 'ऑर्डर आधार रिप्रिंट' वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा व्हीआयडी आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा. तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल नोंदवला असेल त्यावर 'OTP पाठवा' वर क्लिक करा. जर तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर मोबाईनल नंबर बॉक्सवर क्लिक करून मोबाईल नंबर टाका. सेंड OTP वर क्लिक करा.

मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाका आणि टर्म्स अँड कंडीशन वाचून बॉक्सवर टीक करून Agree करा. बेस रिप्रिंट फाइलचे प्रीव्ह्यू वाचा, फाइल करा. तथापि, नॉन-व्हेरिफाईड मोबाईल नंबरसाठी प्रीव्ह्यू उपलब्ध नाही. प्रीव्ह्यू तपासल्यानंतर 'मेक पेमेंट' वर क्लिक करा. तुम्ही क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करू शकता.

मोबाईल नंबरवर एसएमएस येईल

पेमेंट केल्यानंतर पोचपावती क्रमांक, SRN, पेमेंटची तारीख , व्यवहार आयडी डिस्प्ले होईल. एक्नॉलेजमेंट स्लिप डाऊनलोड करण्‍याचा ऑप्शन मिळेल. तुम्हाला SRN नंबर नोंद करून ठेवावा लागेल. एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर SRN तपशीलांसह एसएमएस देखील येईल.