How to Get Rid of Cockroach: क्वचितच असे स्वयंपाकघर असेल जिथे झुरळ कधीच आले नसतील. झुरळ पाहिलं की किळस वाटते. प्रत्येकजण या झुरळापासून मुक्त होऊ इच्छित असतो. झुरळ स्वयंपाकघरातसोबतच अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतात. झुरळांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. झुरळांमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्वचेवर रॅशेस येणे, डोळ्यांतून पाणी येणे, सतत शिंका येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे झुरळांवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात झुरळांना पळवण्याचे सोपे घरगुती उपाय.
रॉकेल
रॉकेलचा वास खूप तीव्र असतो, त्यामुळे झुरळ येत नाही. लादी पुसताना पाण्यात काही थेंब रॉकेलचे टाका. जेथे पुसणे कठीण तिथे रॉकेल शिंपडाव. आग लागण्याचा धोका असलेल्या ठिकाणी रॉकेल टाकू नका.
तमालपत्र
तमालपत्राचा वापर सामान्यतः अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र यामुळे झुरळांच्या त्रासातून मुक्त होऊ शकता. झुरळे या मसाल्याचा वास सहन करू शकत नाहीत. ही पाने कुस्करून जिथे झुरळ जास्त येतात तिथे ठेवा.
लवंग
लवंग हे सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध मानले जाते, ज्यामुळे झुरळ पळून जातात. जिथे तुम्हाला झुरळ दिसतील तिथे लवंगाचे काही तुकडे टाका.
घर स्वच्छ ठेवा
झुरळ प्रामुख्याने घाणीमुळे येतात, घराची नियमित साफसफाई केल्यास या समस्येपासून लवकरच सुटका होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)