आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी जोडणे अनिवार्य, पाहा कसं लिंक करावं

ड्रायव्हिंग लायसन्सला  (Driving licance) आधारशी जोडल्यानंतर फसवणूक आणि एकापेक्षा जास्त परवानाधारकांवर नियंत्रण ठेवले जाईल. तसेच भ्रष्टाचार संपेल 

Updated: Mar 16, 2021, 07:02 PM IST
आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी जोडणे अनिवार्य, पाहा कसं लिंक करावं title=

मुंबई : अलीकडेच केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने पोर्टलद्वारे  देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड (Aadhaar Card) अनिवार्य केले होते. यामध्ये आता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डशी लिंक करणे देखील आवश्यक असेल.

वाहन चालकांना  आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving licance), लर्निंग लायसन्स (Learning licance), ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (Driving licance renewal) व ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता बदलणे  (Driving licance address change)यासारख्या 16 ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार ऑथेंटिकेशनची आवशकता असेल.

ड्रायव्हिंग लायसन्सला  (Driving licance) आधारशी जोडल्यानंतर फसवणूक आणि एकापेक्षा जास्त परवानाधारकांवर नियंत्रण ठेवले जाईल. तसेच भ्रष्टाचार संपेल आणि कामात पारदर्शकता येईल. यामुळे विभागाचे काम सोयीसकर होईल.

अशाप्रकारे ड्राइविंग लायसन्सला आधारकार्ड सोबत लिंक करा

-परवाना आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रथम राज्य परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जा.

-येथील लिंक आधार या option वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्स  (Driving licance) option निवडा.

-असे केल्यावर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि गेट डिटेल्स (Get details) वर क्लिक करा.

-आपला 12-अंकी आधार नंबर आणि मोबाइल नंबर येथे प्रविष्ट करा.

-ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिटवर (Submit) क्लिक करा.

-असे केल्यावर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) येईल.

-आता ओटीपी (OTP) टाकून ड्रायव्हिंग लायसन्सला  (Driving licance) आधारशी जोडण्याची (Aadhaar Card)  प्रक्रिया पूर्ण करा.