पोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक

जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...

Updated: Nov 4, 2022, 05:21 PM IST
पोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक  title=

मुंबई : भारतीय लोकांच जेवणं हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. यासाठीच आज आपण मऊ आणि छान फुललेली चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया, चला जाणून घेऊया चपाती बनवण्याची सोपी पद्धत…

पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणं सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणं वाटतं, परंतु हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. 

पीठ मळताना या गोष्टी लक्षात ठेवा

पीठ पटपट मिळाल्यानं पोळीची चव खराब होऊ शकते. त्यामुळे थोडा वेळ गेला चालेल पण पीठ 5 ते 10 मिनिटं मळा.

कोणतीही भाजी बनवताना किंवा स्वयंपाक करताना आपण सगळ्या गोष्टी मोजून घेतो पण पीठ मळताना आपण असं करत नाही. बऱ्याचवेळा असं केल्यानं पीठ एकतर कडक होतं किंवा खूप मऊ होतं. त्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यासाठी मोजून पाणी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 2 कप पीठासाठी 2 कप पाणी घ्या.

नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी घाला.

पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा. कारण मीठ देखील पाणी सोडते. यामुळे पीठाला कणिक ओलं होण्याची शक्यता असते.

एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून 5 मिनिटे राहू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा कणिकाला चांगले मळा.

त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा, या वेळी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल.

 त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल. (How To Make Soft Roti Or Chapati Perfect Dough Making Tricks Know The Detail) 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)