क्या बात है! चुटकीसरशी सोडवलं इतकं कठीण Puzzle, पाहा Video

Desi Trick To Solve Iron Stick: सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असून प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. अनेक जण व्हिडीओ गेम आणि इतर कोडं सोडवण्यात गुंतलेले असतात. मात्र काही देसी Puzzle लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. काही जण झटपट हा गुंता सोडवतात. मात्र काही जणांना हा गुंता सोडवणं कठीण जातं.

Updated: Dec 15, 2022, 07:13 PM IST
क्या बात है! चुटकीसरशी सोडवलं इतकं कठीण Puzzle, पाहा Video title=

Desi Trick To Solve Iron Stick: सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असून प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. अनेक जण व्हिडीओ गेम आणि इतर कोडं सोडवण्यात गुंतलेले असतात. मात्र काही देसी Puzzle लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. काही जण झटपट हा गुंता सोडवतात. मात्र काही जणांना हा गुंता सोडवणं कठीण जातं. एक चोकौनी रॉडमध्ये एक स्टिक अडकलेली दिसते. ही स्टिक बाहेर काढण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. दुसरीकडे कैद्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेड्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूत एक रिंग अडकली आहे आणि ती बाहेर काढण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ एका युजर्सने ट्विटरवर शेअर केला आहे.

चला पटापट हे आव्हान स्वीकारा

एक लोखंडाची चौकोनी फ्रेम आहे. मच्छर कॉईलसारखा चोकौनात रॉड फिरवला आहे. त्यात एक लांब रॉड अडकली आहे. लांब रॉड बाहेर कसं काढावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पहिल्या प्रयत्नात अपयश येतं. मात्र एका ट्रिकने लांब रॉड काढण्यात यश मिळतं. त्यानंतर दुसरं कोडंही काहिसं तसंच आहे. बेड्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूतील अडकलेली रिंक काढण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. इथेही अशी ट्रिक वापरली जाते की चुटकीसरशी रिंग बाहेर निघते. 

बातमी वाचा- Sonu Soon जेव्हा इंस्टाग्राम स्टार Khaby Lame ला भेटतो, तेव्हा होतं असं की...! Watch Video

हा व्हिडीओ Morissa Schwartz या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 49 सेकंदाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.