कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची कशी घ्याल काळजी, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

 देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आयुष मंत्रालयाने लहान मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स (corona new guidelines) जारी केल्या आहेत.

Updated: Jun 15, 2021, 07:33 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची कशी घ्याल काळजी, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आयुष मंत्रालयाने लहान मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स (corona new guidelines) जारी केल्या आहेत. यात योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यासह योगा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

जरी कोरोनाच्या  (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी पालकांनो घाबरु नका. मुलांची काळजी घ्या, असे आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

काय आहेत नव्या गाईडलाईन्स

1) थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, 4 ते 5 दिवस ताप कायम राहतो, जेवण कमी होत आणिचिडचिड, ऑक्सिजन लेव्हल 95 टक्क्यांहून कमी झाल्यास डॉक्टरांना दाखवा
2) मधुमेह, हृदय, फुफ्फुसांचा आजार असणाऱ्या  मुलांना कोरोना सर्वाधिक धोका
3) नवजात बाळाला आईचे दूध गरजेचे आहे.
4) मुलांना हात स्वच्छ धुवायला सांगा, घराबाहेर पडताना मास्क आवश्यक
5) 2 ते 5 वयोगटातील मुलांनी मास्क लावल्यास पालकांनी लक्ष ठेवा
6) मुलांसाठी नॉन मेडिकल किंवा तीन लेअरचा सुती कपड्याचा मास्क योग्य
7) गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नका
8) मुलांना व्हिडिओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात ठेवा
9) कोरोनाची लक्षणे जाणवल्यास मुलांना वृद्धांपासून दूर ठेवा
10) मुलांकडून योगा करुन घ्या