नवी दिल्ली : जर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचे सबस्क्राईबर असाल तर, तुमचा फंड NPS मध्ये काही अटींनुसार ट्रान्सफर करू शकता. पेंशन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी सबस्क्राईबरला ही सुविधा देतात. How to transfer EPF balance to NPS account
जर तुम्हाला EPF फंड NPSमध्ये ट्रान्सफर करायचा असेल तर तुमच्याकडे एक सक्रीय NPSचे टिअर 1 अकॉऊंट असायला हवे. यासाठी तुम्हाला पॉइंट ऑफ प्रेजेंस या eNPS च्या पोर्टलवर जाऊन आपले अकॉऊंट सुरू करता येईल. अकॉऊंट सुरू करण्यासाठी npstrust.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.
NPS अकॉऊंट सुरू केल्यानंतर एम्प्लॉयरकडे ट्रान्सफर फॉर्म सबमिट करावा लागतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर EPFO, EPF खात्यात असलेल्या रक्कमेला ट्रान्सफर करता येईल. NPS नोडल कार्यालय किंवा POP रिटायरमेंट बॉडीतर्फे चेक ड्राफ्ट जारी करण्यात येईल.
फंड जमा झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वेरिफाई अलर्ट मिळेल. त्यानंतर नोडल अधिकारी टिअर 1 अकॉऊंटमध्ये रक्कम अपडेट करेल.
लॉन्गटर्मसाठी NPSच्या माध्यामातून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. सध्याच्या महागाईची चाल पाहिल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणे गरजेचे आहे. इनकम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 80 सी मध्ये 1.5 लाख रुपये पर्यंतच्या टॅक्स डिक्शनचा लाभ घेता येईल. जर तुम्ही रिटायरमेंटसाठी जमा केलेल्या फंडवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यास इच्छुक असाल तर EPF ला NPSमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकते.