Modi Govt : कसा होता मोदी सरकारचा 8 वर्षांचा कार्यकाळ? पाहा सर्वेक्षणात काय आलं पुढे

मोदी सरकारने आपला 8 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याबाबत लोकांना काय वाटतंय जाणून घ्या.

Updated: May 30, 2022, 07:20 PM IST
Modi Govt : कसा होता मोदी सरकारचा 8 वर्षांचा कार्यकाळ? पाहा सर्वेक्षणात काय आलं पुढे title=

Eight Years of Modi Govt : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा शपथ घेतली. मोदी सरकार 2.0 ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने कोरोनाच्या 3 लाटेचा सामना केला. मोठ्या प्रमाणात लसीकरण, लोकांना मोफत रेशन, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि युक्रेन-रशिया युद्धावर सरकारची तटस्थ भूमिका या सरकारच्या काळात पाहायला मिळाल्या आहेत

LocalCircles गेल्या 8 वर्षांपासून वार्षिक सर्वेक्षण करत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. हे सर्वेक्षण सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी म्हणजेच 6 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मोदी सरकार 1.0 आपल्या 5 वर्षात लोकांच्या अपेक्षांवर जास्त खरा उतरला आहे. 2019 मध्ये PM मोदींच्या नेतृत्वाखाली NDA ने 353 जागा जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या. 30 मे 2022 रोजी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या अभ्यासात, भारतातील 350 जिल्ह्यांतील 64,000 हून अधिक नागरिकांकडून सुमारे 221,000 प्रतिसाद प्राप्त झाले. या सर्वेक्षणात ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश होता.

सर्वेक्षणात काय म्हटले होते?

सुमारे 33% नागरिकांनी सांगितले की सरकारने त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले आहे. तर 34% लोकांनी सांगितले की सरकारने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर, मोदी सरकार 2.0 चे रेटिंग गेल्या तीनमध्ये 51 टक्क्यांवरून 67 टक्क्यांवर गेले आहे. 37 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर काम करत आहे. 2020 मध्ये, 29 टक्के लोकांचा असा विश्वास होता की सरकार या समस्येकडे गांभीर्याने पाहत आहे. तर 2021 मध्ये या दरात थोडीशी घट झाली होती. 

27 टक्के लोकांनी आपले मत मांडले होते. याशिवाय, 2020 मध्ये, 37 टक्के लोकांचा असा विश्वास होता की स्वयंरोजगार स्थापित करणे सोपे झाले आहे. 2021 मध्ये हा आकडा 44 टक्के आणि 2022 मध्ये 60 टक्के झाला.

जगामध्ये देशाची विश्वासार्हता वाढली

जगामध्ये भारताच्या विश्वासार्हतेचा विचार केला तर 2020 मध्ये 79 टक्के लोकांचा असा विश्वास होता की जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारली आहे. 2021 मध्ये 59 टक्के लोकांनी हा विश्वास व्यक्त केला होता. 2020 मध्ये पुन्हा हा आकडा 79 टक्क्यांवर होता.

2022 च्या सर्वेक्षणात भ्रष्टाचार कमी करण्यात फारशी सुधारणा दिसून आली नाही. 2020 मध्ये, 49% नागरिकांनी भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगितले, परंतु 2021 च्या सर्वेक्षणात ही टक्केवारी 39% पर्यंत खाली आली. गेल्या 3 वर्षात भ्रष्टाचार कमी झाल्याचे 46% नागरिकांनी गृहीत धरून यावर्षी रेटिंग थोडे चांगले झाले आहे.

महागाई वाढली की कमी झाली?

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याबाबत बोलायचे झाले तर गेल्या तीन वर्षांत त्यात घट होताना दिसत आहे. 2002 मध्ये, 36 टक्के लोकांचा असा विश्वास होता की सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. 2021 मध्ये त्यात घट झाली आणि ती 19 टक्के राहिली. 2022 मध्ये केवळ 17 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करत आहे.

जातीयवादावर नियंत्रण किती?

यासाठी 11 हजार 394 जणांची उत्तरे प्राप्त झाली. सरकारने जातीयवादाचा मुद्दा चांगल्या पद्धतीने हाताळला असे सुमारे ६० टक्के लोकांचे मत आहे. यामध्ये सरकार अपयशी ठरल्याचे ३३ टक्के लोकांचे मत आहे. ७ टक्के लोकांनी उत्तर दिले की सांगता येत नाही.

दहशतवाद नियंत्रणात की बेलगाम?

मोदी सरकार 2.0 च्या तीन वर्षात दहशतवाद कमी झाला आहे की नाही असे विचारले असता, 81 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. 14 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आणि 5 टक्के लोकांनी सांगू शकत नाही असे सांगितले. या प्रश्नावर 11321 उत्तरे प्राप्त झाली.