Budget 2021 : कसं असेल यंदाचं बजेट? Astrology मध्ये काय म्हटलंय.....

राशींवर असा होणार बजेटचा परिणाम 

Updated: Jan 24, 2021, 02:58 PM IST
Budget 2021 : कसं असेल यंदाचं बजेट? Astrology मध्ये काय म्हटलंय.....

मुंबई : Budget 2021 पुढच्या आठवड्यात सादर होणार आहे. केंद्र सरकार नवीन आर्थिक वर्षाचं बजेट जाहीर करणार आहे. कोरोनाच्या महामारीनंतर एक वर्षानंतर हे बजेट सादर होणार आहे. यामुळे सगळेच जण या बजेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपली माणसं तर गमावली पण त्यासोबतच आर्थिक नुकसानाला देखील सामोरं जावं लागलं. अशातच बजेटवरून अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. 

सरकार कोणत्या क्षेत्राकडे जास्त लक्ष देईल. तर कोणत्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करेल याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार यंदाचं Budget 2021 कसं असेल याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगत ते पाहा. 

अशी आहे ग्रहांची स्थिती 

आताच्या ग्रह आणि राशींची स्थिती पाहता १४ जानेवारी रोजी सूर्य उत्तरायणावरन मकर राशीत प्रवेश करत आहे. यावरून खरमास संपणार आहे. यासोबतच १४ जानेवारीला पंचग्रहीचा योग आहे. ज्यामध्ये सूर्य, बुध, गुरू, चंद्र, शनि आणि मकर राशीत आहे. या शुभ योग मानला जातो. 

यावरून असा अनुमान लावला जात हे की, हा योग संतुलन साधण्यासाठी अतिशय योग्य आहे. ही स्थिती आणखी काही दिवस असणार आहे. १७ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी ही स्थिती बदलली आहे.

या दोन्ही ग्रहांनी १० दिवसांत अशाप्रकारे अस्त होणं खूप महत्वाचं आहे. याचा परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे. तसेच याचा परिणाम देशातील आणि समाजातील महत्वाच्या गोष्टींवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे Budget 2021 महत्वाचं असणार आहे. 

बजेटवर काय होणार परिणाम 

१ फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी बजेट सादर करणार आहे. कोरोना नंतरच्या बजेटकडे सगळ्यांचच लक्ष आहे. ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर ग्रहांची स्थिती ही प्रत्येक राशीसाठी वेगळं असणार आहे. आरोग्य, रक्षण आणि सूचनेला यातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.