close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुराचं पाणी घरात, पत्नीचं स्विमिंग जोरात; व्हिडिओ व्हायरल

नेटकऱ्यांकडूनही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

Updated: Sep 22, 2019, 03:46 PM IST
पुराचं पाणी घरात, पत्नीचं स्विमिंग जोरात; व्हिडिओ व्हायरल

प्रयागराज : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये सध्या पूरस्थिती आहे. संगम आणि त्या आसपासच्या परिसरातील अनेक भागातील घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. पुराने लोकांचं जनजीवन विस्कळित झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त भागाचा दौराही केला होता. 

पुरामुळे अनेक लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लगतोय. तर दुसरीकडे काही लोक घरात गंगा येण्याने आनंदी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशाच आनंदी झालेल्या पती-पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडूनही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एका घरात कमरेएवढं पुराचं पाणी शिरल्याचं दिसतंय. घरात भरलेल्या या पाण्यात पती-पत्नी डुबक्या घेतना दिसतात. 

ऐवढंच नाही तर, पती घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यातच पत्नीला पोहायलाही शिकवतानाचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मात्र, हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.