रात्रीच्या वेळीस घेतो विचित्रच अवतार, पतीविरोधात पत्नीने ठोठावले कोर्टाचे दार

मध्य प्रदेशमधून एक विचित्रचं घटना समोर आली आहे. 

Updated: Jun 17, 2022, 09:59 PM IST
रात्रीच्या वेळीस घेतो विचित्रच अवतार, पतीविरोधात पत्नीने ठोठावले कोर्टाचे दार title=

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधून एक विचित्रचं घटना समोर आली आहे. या घटनेत पतीच्या वेगळ्याच वागण्याला कंटाळून पत्नीने थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. पत्नीच्या या याचिकेवरील सुनावणीत पतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती वाचून एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकेल, असे हे धक्कादायक प्रकरण आहे.  

इंदूरमध्ये एका इंजिनियर पतीचा आणि त्याच्या पत्नीचा २९ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले होते. लग्नाचे सुरुवातीचे दिवस खुप चांगले गेले. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पतीसह सासरच्या लोकांनी तिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून टोमणे मारण्यास सुरुवात केली होती. 

पत्नीच्या आरोपानुसार, आरोपी आणि सासरचे कुटुंबीय तिच्याकडे दैनंदिन खर्चासाठी पैशांची मागणी करायचे आणि जर ते दिले नाही तिला वेगळ्या खोलीत बंद करायचे. पत्नीचे या सर्व घटनांना कंटाळून आता कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही पार पडली आहे.  

पतीवर गंभीर आरोप 
पत्नीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पती रात्र झाल्यावर महिलांसारखा मेकअप करत स्त्रीसारखे कपडे घालतो आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही, असे म्हटले आहे.तिने तिच्या पतीचा स्त्रीच्या वेशात फोटो काढला होता आणि व्हिडिओही बनवला होता. तसेच रात्रीच्या वेळी तिचा नवरा दुसऱ्या खोलीत झोपायला जातो, अशी धक्कादायक माहितीही दिली आहे. 

शारीरिक संबंध ठेवत नाही
पीडित महिलेने पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल केला होता, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवले नाहीत आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. 

पीडितेच्या वकिलानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे पत्नीशी शारीरिक संबंध ठेवत नव्हता.आरोपी कपाळावर बिंदी, ओठावर लिपस्टिक, संध्याकाळी कानात झुमके लावून महिलेचा मानसिक छळ करत अशी धक्कादायक माहिती त्यांना दिली.  

पीडित महिलेने न्यायासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पतीचा जामीन अर्ज फेटाळून त्याची कारागृहात रवानगी केली. तसेच पीडित पत्नीला दरमहा 30 हजार रुपये भत्ता द्यावा, असे आदेश दिले.