हा महाशय रोमँटिक डान्स करता करता झाला Oops moments चा शिकार, पाहा व्हिडीओ

डान्स करताना या व्यक्तीसोबत जे घडलं ते कुणासोबत घडू नये...नाहीतर काय होईल हे हा व्हिडीओ पाहून तुम्हीच विचार करा

Updated: Aug 15, 2021, 03:45 PM IST
हा महाशय रोमँटिक डान्स करता करता झाला Oops moments चा शिकार, पाहा व्हिडीओ

मुंबई: समारंभात अनेक गमतीजमती घडत असतात त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असतात. सध्या लग्नातील मजेशीर व्हिडीओचा ट्रेन्ड सुरू असताना एक व्हिडीओ मध्येच अचानक चर्चेत आला आहे. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटिंना Oops momentsचा शिकार झाल्याचं ऐकलं असेल किंवा व्हिडीओमध्ये पाहिलं असेल. पण चक्क एक व्यक्ती रोमँटिक डान्स करताना  Oops moment चा शिकार झाला. त्याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पती-पत्नी रोमँटिक डान्स करण्याच्या तयारीत होते. त्यांची केमेस्ट्री रंगात आली असताना आता या व्यक्ती  Oops moment चा शिकार झाला. हा प्रकार घडल्याने लाज गेल्यासारखंच झालं. सर्वांसमोर पँट खाली घसरल्याचा लाजीरवाणा प्रकार घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Young Landlord (@younglandlord01)

डान्स करताना या व्यक्तीसोबत जे घडलं ते कुणासोबत घडू नये. त्यामुळे तुम्ही जर अशा कुठल्या कार्यक्रमाला जात असाल तर नक्की असे काही प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्या. कार्यक्रम राहिला बाजूलाच पण त्याला आपली पँट सांभाळावी लागते. हा व्यक्ती परिस्थिती हॅण्डल करतो मात्र त्याचं झालेलं हे हसं भरून न निघण्यासारखं आहे.