मुंबई : ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter)भारतीय बाजारात लॉंच केली आहे. ओलाच्या या स्कूटरचे भारतीय ग्राहकांना कुतूहल होते. आज कंपनी ग्राहकांसाठी 2 वेरिएंटमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली आहे. स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे.
अशी करू शकता बुकिंग
जर तुम्ही ओला स्कूटर बुक करू इच्छिता तर थेट कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बुक करू शकता. ई स्कूटरला 10 रंगाच्या वेरिएंटमध्ये लॉंच करण्यात येणार आहे. यामध्ये ब्लॅक, व्हाईट, रेड, यलो, ब्लू आणि त्यांचे शेड सामिल आहेत.
400 शहरांमध्ये बननार चार्जिंग स्टेशन
भारतात ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कंपनी 400 शहरांमध्ये 1 लाखाहून जास्त लोकेशनवर हाईपरचार्जर(Hypercharger)लावणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकांना चार्जिंग करण्यात अडचण येऊन नये म्हणून चार्जिंग स्टेशनची माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवालने लॉंचच्या आधी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, आज आमच्या फ्युचर फॅक्टरीमध्ये पहिली स्कूटर बनवण्यात आली आहे. कोरोना महामारी दरम्यान फेब्रुवारीत घेतलेल्या माळरान जमीनीवर 6 महिन्यात फ्युचर फॅक्टरी तयार झाली. ओला इलेक्ट्रिक टीमने (OLA Electric) कमाल केली आहे.