धक्कादायक! वडिलांच्या गाडीखाली 4 वर्षांचा चिमुरडा चिरडला, व्हिडीओ

तो गाडी वळवत राहिला आणि 4 वर्षांचा चिमुरडा मात्र चिरडला... हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

Updated: Nov 25, 2021, 07:19 PM IST
धक्कादायक! वडिलांच्या गाडीखाली 4 वर्षांचा चिमुरडा चिरडला, व्हिडीओ title=

हैदराबाद: छोटंस दुर्लक्ष आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुकल्याच्या जीवावर बेतू शकतं. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं हे सांगणारी पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांनी चुकून आपल्याच चिमुकल्याच्या अंगावर गाडी घातली. 

गाडीखाली चिरडून या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आपलाच चिमुकला आपल्या गाडीखाली यावा यासारखी दुर्दैवी घटना एका बापासाठी आणखी कोणती असेल. हा नुसता विचारही अंगावर काटा आणणारा आहे. मात्र ही घटना प्रत्यक्षात हैदराबाद इथे घडली आहे. 

हैदराबादमधल्या एलबी नगर इथली हृदय पिळवटून काढणारी ही घटना समोर आली आहे. वडील आपलं काम आवरून कामासाठी बाहेर निघाले. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला गाडीत बसले. गाडी सुरूही केली. इथपर्यंत सगळंकाही ठिक होतं. 

अचानक गाडी वळवत असताना त्यांचा चिमुकला खेळता खेळता या गाडीखाली आला. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेमुळे त्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हा चिमुकला जेमतेम 4 वर्षांचा होता अशी माहिती समोर आली आहे. 

लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना डोळ्यात तेल घालून जपा. कारण ती खेळता खेळता कधी काय होईल याचा नेम नाही. त्यांना एकटं सोडणं हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं.