हैदराबाद एन्काऊंटरनंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण

Updated: Dec 6, 2019, 01:55 PM IST
हैदराबाद एन्काऊंटरनंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची  प्रतिक्रिया

मुंबई : हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरचा सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आलं. या प्रकरणातील चारही आरोपींचं आज पहाटे एनकाऊंटर करण्यात आलं. ज्या ठिकणी या चारही आरोपींनी डॉक्टर महिलेसोबत निघृण कृत्य केलं त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले असता तेथे त्यांच एन्काऊंटर झालं. या घटनेवर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

सामान्य नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने पीडितेला न्याय मिळाला ही माझी प्राथमिक प्रतिक्रिया असल्याचं उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,' असंही निकम यांनी सांगितलं. न्यायालयीन प्रक्रियेवरून नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे या एनकाऊंटर नंतर सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीला स्वसंरक्षणाचा कायदाने अधिकार आहे. आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गोळीबार देखील करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी स्वरक्षणासाठी एनकाऊंटर केलं. पण अशी वस्तूस्थिती डोळ्यासमोर येते की, पोलीस कर्मचारी यावेळी गाफील होते का? आरोपींना बेड्या घातल्या नव्हत्या का?

पोलिसांना देखील स्वरक्षणाचा अधिकार आहे. तशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती तर मग पोलिसांनी आरोपीला कंबरेखाली गोळी का मारली नाही? त्यांना अपंग जनतेकडून आनंद उत्सव साजरा केला जातोय. आमचा कायदा अपंग झालाय अशी धारणा नागरिकांची होता कामा नये. लोकांनी कायद्याने प्रस्थापित केलेली संकल्पना मोडकळील निघाली अशी भावना निर्माण होऊ नये. न्यायालयाकडून निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी देखील यासगळ्याला जबाबदार असल्याचे उज्वल निकम म्हणाले. कायद्याचा दरारा निर्माण होत नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.