प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने केली आत्महत्या

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच एका तरुणीने फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीये.

Updated: Mar 16, 2018, 01:14 PM IST
प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने केली आत्महत्या  title=

हैदराबाद : प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच एका तरुणीने फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीये.

ही घटना सायराबाद भागातील आहे. गेल्या बुधवारी डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केली.

तो आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलत होता. यावेळी कॉल सुरु असताना त्याने फाशी लावून घेतली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा हा तरुण एकटाच घरात होता. त्यानंतर त्याच्या घरच्यांना पंख्याला लटकलेला त्याचा मृतदेह आढळला. बहिणीच्या साडीने फाशी लावून घेत या तरुणाने आत्महत्या केली. 

तपासादरम्यान पोलिसांनी या तरुणाचा मोबाईल जप्त केलाय. तसेच सीआरपीसीच्या १७४ कलमांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. याप्रकऱणी अधिक तपास सुरु आहे.