90 च्या दशकात बर्थडे पार्टीमध्ये दिल्या जायच्या 'या' गोष्टी, पण यात एक गोष्ट मात्र मिसिंग....

नव्वदच्या दशकातील जन्मलेल्या मुलांसदर्भात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या मुलांच्या गोड आठवणी आहे.

Updated: Apr 25, 2022, 07:58 PM IST
90 च्या दशकात बर्थडे पार्टीमध्ये दिल्या जायच्या 'या' गोष्टी, पण यात एक गोष्ट मात्र मिसिंग.... title=

मुंबई :  नव्वदच्या दशकातील मुलांविषयी अनेक मिम्स समोर येतात, ज्यामध्ये असे म्हटले जाते की, या दशकातील मुलांनी पूर्वीचे जूणे दिवस आणि आताचे नवीन डिजीटल युग पाहण्याचे भाग्य लाभले आहे. परंतु या नव्वदीच्या दशकातील मुलांच्या आठवणी काही वेगळ्याच आहेत. ज्याचं महत्व आज कालच्या मुलांना समजून घेणं फारचं कठीण आहे. कारण आजकालच्या मुलांना त्या गोष्टी फारच आउट डेटेड वाटतात. परंतु नव्वदीमधील मुलांसाठी मात्र त्या गोष्टी मिळवणं ही फार मोठी गोष्ट होती. सध्या नव्वदच्या दशकातील जन्मलेल्या मुलांसदर्भात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या मुलांच्या गोड आठवणी आहे.

त्या काळच्या वाढदिवसाच्या पार्ट्या या त्यांच्या स्नॅक्सच्या कॉम्बोसाठी ओळखल्या जात होत्या, ज्यात समोसे, गुलाब जामुन, बिस्किटे आणि नमकीन यांचा समावेश होता. त्याकाळी एखाद्या मुलाच्या वाढदिवसाला या गोष्टी वाटणं त्या मुलासाठी त्याच्या मित्र परिवारासाठी फार आनंदाचं होतं.

एका IAS अधिकाऱ्याने ट्विटरवर या स्नॅक्सचा फोटो शेअर केला आहे, जो बऱ्याच लोकांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत आहे, ज्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये IAS अधिकारी अवनीश शरण यांनी लिहिले की, '80-90 च्या दशकात मुलांची बर्थडे पार्टी स्नॅक्स.'

या फोटोला ट्विटरवर 16 हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या फोटोवर हजारो कमेंट्स देखील करण्यात आले आहेत.

एका यूजरने लिहिले, '...आणि गिफ्टमध्ये स्केच पेन, रंगीत पेन्सिल, पेन्सिल बॉक्स द्यायचे.' दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली, 'समोसा आणि गुलाब जामुन अजूनही माझे आवडते आहेत.' तर, तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'आणि त्याच प्लेटमधील केकचा तो तुकडा ज्याला शेवटी वेफर्स, बिस्कीट आणि समोस्याला लागलेला असायचा....'

आयएएस अधिकाऱ्याकडून ट्विटरवर पोस्ट शेअर

या पोस्टच्या कमेंटवर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनीही अनेक उत्तरे दिली. त्यांनी एका कमेंटला उत्तर देताना लिहिले की, 'मित्रांना आधीच सांगून ठेवायचे की कोणते गिफ्ट हवंय, म्हणजे गिफ्ट सगळ्या भेटवस्तु कामाच्या आणि वेगवेगळ्या असतील.'

आज कालच्या मुलांना हा फोटो पाहून नव्वदीच्या मुलांचा आनंद कळणार नाही. कारण त्यांच्या वाढदिवसांच्या पार्टीच स्वरुप आता बदललं आहे. परंतु या फोटोचा खरा आनंद किंवा महत्व त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी तो क्षण जगला आहे.

कदाचित 90 च्या काळातील लोक या फोटोमधील सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतील, किंवा त्याला खाऊ शकतील, परंतु या सगळ्यात मिसिंग आहे, ते म्हणजे त्यांचं बालपण आणि त्या आठवणी....