IAS नं शेअर केलेल्या लग्नातील 'त्या' फोटोची का होतेय चर्चा? पाहा फोटो

सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नात लोक नवनवीन कपडे, दागिने घालुन येतात.

Updated: Feb 18, 2022, 08:51 PM IST
IAS नं शेअर केलेल्या लग्नातील 'त्या' फोटोची का होतेय चर्चा? पाहा फोटो title=

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नात लोक नवनवीन कपडे, दागिने घालुन येतात. तसेच लग्नात सर्वात महात्वाची गोष्ट आणि लोक ज्यासाठी आवर्जुन जातात, ते म्हणजे लग्नातील जेवण. लग्नच नाही तर इतर कोणताही कार्यक्रम असो. त्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतोच. अशा प्रसंगी शेकडो, ते लाखो लोकांसाठी जेवण बनवले जाते.

त्यात लोकं ताटभर अन्न घेतात आणि लोकांचं पोट भरलं की मग ते उरलेलं अन्न फेकून देतात. त्यामुळे लग्न कार्यात असं बरंच अन्न वाया जातं, ज्याचा आपण विचार देखील करत नाही.

जिथे आपल्या सारख्या लोकांना इतक अन्न खायला मिळतं, पण एक असा वर्ग देखील आहे, ज्याला एकवेळेचं अन्न देखील नशीबात नाही. हेच अन्न जर अशा लोकांमध्ये वाटले गेले तर या गरजु लोकांच पोट भरेल.

त्यामुळे अन्नाचा कधीही अपमान करू नये आणि अन्न वाया जाऊ नये. आपल्याला अन्नदात्यानं जे दिलं आहे, त्यासाठी आपण ऋणी रहावे.

अशाच एका लग्नातील वाया गेलेल्या अन्नाचा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुमच्या लग्नाच्या फोटोग्राफरने मिस केलेला फोटो. अन्न वाया घालवणे थांबवा.'

हा फोटो पाहून तुमच्या ही लक्षात येईल की एका कार्यक्रमात लोक किती अन्न वाया घालवतात. ज्यामध्ये अनेक लोकांचे पोट भरु शकले असते.

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोवर अनेक लोक कमेंट करत आहेत आणि अशा लोकांवरही ते टीका करत आहेत, जे लग्नात अन्न वाया घालवतात किंवा फेकतात.

आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की देशात असे अनेक लोक आहेत जे एक वेळच्या जेवणासाठीही खूप कष्ट करतात आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना अनेक दिवस अन्न मिळत नाही आणि त्यांना उपाशी पोटी झोपावे लागते. त्यामुळे तुमच्या पुढ्यात आलेल्या अन्नाचा असा अपमान करु नका