IAS Officer Post : वाचून आश्चर्य वाटेल, पण नोकरीला (Job news) असणारी एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काळ हा या नोकरीसाठी, नोकरीच्या ठिकाणी आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत (Co workers) व्यतीत करत असतो. सहसा एखाद्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षे काम करत असता, तेव्हा नकळतच तिथं असणाऱ्या सहकाऱ्यांसोबत एक खास आणि तितकंच अव्यक्त नातं तयार होतं. काहीजण तर, या नात्याला Extended Family असंही नाव देतात. पण, खरंच ही एक्सटेंडेट फॅमिली असते का? खरंच नोकरीच्या ठिकाणी आपले सच्चे दोस्त असतात का? अर्थात प्रत्येकाचा या प्रश्नाचा उत्तर देण्याचा अंदाज आणि उत्तराचे निकष वेगवेगळे असतील. पण, आयएएस अधिकारी अविनाश शरण (IAS Officer Avinash Sharan) यांनी मात्र त्यांचा एक वेगळा आणि तितकाच विचार करण्याजोगा दृष्टीकोन सर्वांपुढे ठेवला आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण (Awanish Sharan) एक कोट ट्विटरवर शेअर केला आहे. 'Not Everyone At Your Workplace Is Your Friend... Do Your Job, Get Paid... Go Home...' असं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. थोडक्यात त्यांचं म्हणणं सांगावं तर, ‘नोकरीच्या ठिकाणी सगळेच तुमचे मित्र नसतात. काम करा, पगार घ्या, घरी जा....’ असं म्हणत तुम्ही सहमत आहात की नाही? असा प्रश्नही केला.
जसं सुरुवातीलाच नमूद केलं, की शरण यांच्या म्हणण्याशी सगळेच सहमत असतील असं नाही. सोशल मीडियावर तेच पाहायला मिळालं. कारण, अनेकांनीच या ट्विटला उत्तर देत आपण शरण यांच्या म्हणण्याशी सहमत नसल्याचं म्हटलं. ऑफिस म्हणजेच आपलं दुसरं घर असल्याचं अनेकांनी म्हटलं. तर, कोणी चांगले सहकारी मिळणं किती भाग्याचं असतं ही बाब स्पष्ट केली. काहींनी मात्र त्यांच्या मताला दुजोरा देत नोकरीच्या ठिकाणी अनेक हसऱ्या चेहऱ्यांमागे स्पर्धा, ईर्ष्या, निंदा, कुरघोडी आणि नकारात्मक भावना दडलेल्या असतात ही बाजूसुद्धा मांडली.