Tina Dabi wedding | IAS टीना दाबी आज होणार महाराष्ट्राची सून

केंद्रीय लोकसेवा आयोगाची  नागरी सेवा परीक्षा पहिल्याचा प्रयत्नात उत्तीर्ण होत देशात पहिला क्रमांक पटकवणारी सनदी अधिकारी टीना दाबी आज लग्नबंधनात अडकणार आहे. 

Updated: Apr 20, 2022, 08:45 AM IST
Tina Dabi wedding | IAS टीना दाबी आज होणार महाराष्ट्राची सून title=

जयपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची  नागरी सेवा परीक्षा पहिल्याचा प्रयत्नात उत्तीर्ण होत देशात पहिला क्रमांक पटकवणारी सनदी अधिकारी टीना दाबी आज लग्नबंधनात अडकणार आहे. IAS अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी टीनाचा लग्नसोहळा आज जयपूर येथे पार पडणार आहे.  आजचा समारंभ  या कार्यक्रमात बडे अधिकारी, राजकारणी तसेच व्हीआयपी लोकांची उपस्थिती असणार आहे.

युपीएससी परीक्षेत मिळवलेल्या उत्तुंग यशानंतर देशभरात प्रसिद्धी मिळालेली IAS अधिकारी टीना दाबी आज IAS प्रदीप गवांडे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. प्रदीप गवांडे यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता.

प्रदीप हे 2013 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.सध्या ते राजस्थान केडरमध्ये कार्यरत असून, राज्याच्या पुरातत्व खात्याचे डायरेक्टर आहेत. प्रदीप गवांडे यांचा जन्म मराठी कुटूंबात झाला असून त्यांनी त्यांचे MBBS चे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केलंय. 

टीना दाबी सुद्धा सध्या राजस्थान केडरची अधिकारी आहे. याआधी तिचे लग्न अतहर अमीर खान यांच्याशी 2018 साली लग्न झाले होते. अतहर यांनीदेखील 2015 साली युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावला होता. परंतू टीना आणि अतहर यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी गेल्या वर्षी एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला होता.