खूशखबर! आता एटीएममधूनच मिळणार तुम्हाला लोन

लोकांची कर्ज काढतांना नेहमी तक्रार असते की कर्ज काढण्यासाठी बँकेत खूप वेळा जाव लागतं. पण आता तुम्हाला यापासून दिलासा मिळणार आहे. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतच लोन घेण्यासाठी बँकेत नाही जावं लागणार. एटीएममधूनच तुम्हा कर्जासाठी अर्ज करु शकता. अर्ज मंजूर झाला तर तुमच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होणार आहेत.

Updated: Aug 14, 2017, 01:53 PM IST
खूशखबर! आता एटीएममधूनच मिळणार तुम्हाला लोन title=

नवी दिल्ली : लोकांची कर्ज काढतांना नेहमी तक्रार असते की कर्ज काढण्यासाठी बँकेत खूप वेळा जाव लागतं. पण आता तुम्हाला यापासून दिलासा मिळणार आहे. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतच लोन घेण्यासाठी बँकेत नाही जावं लागणार. एटीएममधूनच तुम्हा कर्जासाठी अर्ज करु शकता. अर्ज मंजूर झाला तर तुमच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होणार आहेत.

देशातील खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआयने बँकेने त्यांच्या एटीएम मशीन द्वारे लोन देण्याची योजना बनवली आहे. ही योजना महिन्याला सॅलरी घेणाऱ्या लोकांसाठी आहे.

- या योजनेअंतर्गत ६० महिन्यांपर्यंत १५ लाखांच्या लोनसाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला आधी प्री अपरूड लोन ऑफर ठरवावी लागेल.

- ग्राहकांच्या आर्थिक निकषावर तुम्हाला लोन मिळेल.

- प्री अपरूव्ड लोन ऑफर ठरवल्यानंतर ग्राहकांना इंटरेस्ट रेट, प्रोसेसिंग फीस आणि मासिक EMI ची निवड करावी लागेल.

- यानंतर स्क्रीनवर दिलेल्या लोनच्या अटी मान्य कराव्या लागतील.

- ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा डेबिट कार्ड पिन नंबर टाकावा लागेल.

- ही प्रक्रिया पूर्ण होताच लोनची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

- ग्राहकाला किती लोन मिळेल हे त्याच्या सीबील स्कोरवर आधारीत असणार आहे.

- या योजनेअंतर्गत ग्राहकाला 15 लाखांपर्यंत लोन मिळेल.

- बँकेने मागील महिन्यात ही योजना लॉन्च केली आहे.