मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

PTI | Updated: Aug 17, 2017, 10:01 PM IST
मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी title=

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

शरद यादव यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न दिल्लीत केला.  त्याच कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधींनी संघावरही टीकास्त्र सोडलं. 

यावेळी बोलताना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.  ज्या संघानं स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, त्यांनाच सत्तेत आल्यावर तिरंगा आपलासा वाटू लागल्याची घाणाघात राहुल गांधींनी केला. त्याला भाजपनंही चोख उत्तर दिलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x