मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपल्या निवृत्तीनंतरची लाईफ आरामात जावी अशी इच्छा असते. निवृत्तीनंतर म्हातारपणी अनेक वृद्ध पती-पत्नींना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची काळजी घेणारं कोणी नसलं तर आणि परिस्थिती बिकट होते. अशातच रिव्हर्स मॉर्गेज लोन स्किम खूप महत्वाची ठरते. स्टेट बँक ऑफ इंडिया ही स्कीम उपलब्ध करून देते. या स्किमचा फायदा घेऊन तुम्ही म्हातारपण आरामात जगू शकता.
रिवर्स मॉर्गेज लोन स्किम होम लोनच्या विरूद्ध पद्धतीने का करते. होम लोनमध्ये दर महिण्याला हफ्ता भरवा लागतो. तसेच रिवर्स मॉर्गेज लोन स्किममध्ये घर तारण ठेऊन दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळवता येते. सोबतच लोन अप्लिकंटला त्याच घरात राहण्याची परवानगी मिळते. म्हणजेच तुम्ही सध्या घरमालक असाल तर म्हातारपणी प्रत्येक महिन्याला या योजनेतून उत्पन्न मिळवता येऊ शकते.
रिवर्स मॉर्गेज लोनचे फीचर्स
SBI च्या संकेतस्थळावर दिलेल्या उपलब्ध माहितीनुसार, या योजनेचे व्याजदर कमी असते. प्रोसेसिंग फी देखील कमी लागते. जर तुम्ही प्री पेमेंट करणार असाल तर कोणतीही पेनल्टी लागत नाही. प्रोसेसिंग फी लोन रक्कमेच्या 0.5 टक्के इतकी असू शकते. यात कमीतकमी 2000 रुपयांपासून ते 20000 रुपये लागू शकतात.
अटी नियम
जर योजनेअंतर्गत लोन मंजूर झाले. तर कर्ज करार आणि मॉर्गेजवर लागणाऱ्या स्टॅंप ड्युटी, प्रॉपर्टी इंश्योरंन्स प्रीमियम आणि सीईआरएसआय रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल.
लोन अप्लिकंटचा घरावर मालकी हक्क हवा. जर तुमची प्रॉपर्टी कमर्शिअल वापराची आहे तर या स्किमचा लाभ घेता येत नाही.