बिलासपूर : छत्तीसगडमध्ये एका सरकारी शाळेच्या वरिष्ठ शिक्षकच्या फसवणूकीचा प्रकार समोर आले आहे. बिलासपुरात रहाणाऱ्या सरकारी शाळेतील शिक्षकाच्या खात्यावतून 90 हजार रुपये काढले गेले. या शिक्षकाला याची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा, त्याच्या मोबाईवर बॅकेकडून 90 हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज त्याला मिळाला. जेव्हा हे प्रकरण सरकंडा पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा पोलिसांनी सायबर सेलसह या चोरांच शोध सुरू केला आहे.
या शिक्षकाचे नाव रमेशकुमार तिवारी आहे, ते अशोक नगरचे रहिवाशी आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या सायबर चोरांनी या शिक्षकाला एक पीडीएफ पाठवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरले.
रमेशकुमार यांनी आपल्या घरच्या टीव्हीच्या एअरटेल डीटीएचची योजना बदलण्यासाठी Google कडून ग्राहक सेवा क्रमांक शोधला होता. तेथे त्यांना एअरटेल कंपनीचा नंबर मिळण्याऐवजी या सायबर गुन्हेगारांचा नंबर मिळाला. त्यावर रमेशकुमार यांना फोन केला आणि ते या फसवणूकीला बळी पडले.
एएसपी उमेश कश्यप यांनी सांगितले की, 6297388251 या नंबरवरुन या शिक्षकाची फसवणूक केली गेली वापरली गेली. रमेश कुमार यांनी या क्रमांकावर फोन केला असता समोरच्या व्यक्तीने आफण मोबाइल सिम कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्याने ट्रायल म्हणून रमेश कुमार यांच्याकडून दहा रुपये भरपाई मागितली, रमेश यांनी मोबाईल बँकिंगद्वारे 10 रुपये भरले. पण त्यांचे पेमेंट रद्द झाले. यानंतर,या कर्मचाऱ्याने दुसर्या प्रक्रियेची माहिती देऊन 50 रुपयांची मागणी केली.
हे 50 रुपये यावेळी एका पीडीएफद्वारे देण्यासाठी सांगण्यात आले. या सायबर गुन्हेगारांनी रमेशच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पीडीएफ फाईल पाठवली आणि त्यावर क्लिक केल्यावर रमेशने 50 रुपये दिले आणि पुढच्या क्षणाला रमेश कुमार यांच्या खात्यातून 45-45 हजार करुन दोन वेळा खात्यातून पैसे वजा झाले म्हणजेच एकूण 90 हजार रुपये खात्यातून काढले गेले. त्यानंतर रमेश कुमार यांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.