लोकसभेत उद्या मांडली जाणार महत्वाची विधेयकं, भाजपने खासदारांना जारी केला व्हिप

 लोकसभेचं कामकाज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Updated: Feb 12, 2021, 08:15 PM IST
लोकसभेत उद्या मांडली जाणार महत्वाची विधेयकं, भाजपने खासदारांना जारी केला व्हिप title=

नवी दिल्ली : उद्या सकाळी दहा वाजता लोकसभेची कार्यवाही सुरू होईल. उद्या अनेक महत्वाच्या विधेयकावर सभागृहात चर्चा होईल. त्याचवेळी, भाजपने खासदारांना तीन लाईन व्हिप जारी केला आहे. काही महत्त्वपूर्ण व्यवसाय विधेयकांवर लोकसभेत 13 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी चर्चा होईल आणि ते सभागृहात मंजूर होऊ शकतात. उद्या सकाळी दहा वाजेपासून लोकसभेतील सर्व भाजप सदस्यांनी सभागृहात सकारात्मकपणे उपस्थित रहावे व सरकारच्या बाजूने पाठिंबा द्यावा, अशी विनंती पक्षाने केली आहे.

बजेट सत्राच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले की, लोकसभेचं कामकाज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला टप्पा 29 सप्टेंबर ते 13 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यसभेचं कामकाज शुक्रवारी संपले आहे, त्यामुळे शनिवारी राज्यसभेचं कामकाज होणार नाही. लोकसभेचं उद्या सकाळी दहापासून कामकाज सुरु होणार आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, शनिवारी, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 140 वाजता कामकाज सुरु होईल

बातमी : आफ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत

उल्लेखनीय आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा बैठक सुरू होण्याची वेळ सकाळी नऊ वाजता होती आणि लोकसभेचे सभा सुरू होण्याची वेळ दुपारी चार वाजता होती. कोरोना विषाणूमुळे, दोन्ही  सभागृहात बसण्याची व्यवस्था पाहता हा बदल करण्यात आला आणि प्रत्येक सदस्यांसाठी सामाजिक अंतर राखण्यात आले होते. याआधी साधारणत: दोन्ही सभागृहांचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होत होते.