भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताच्या क्रमांकात सुधार, चीन-पाकिस्तानमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार

रशिया, चीन आणि पाकिस्तान सहित 102 देशांमध्ये जास्त भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Updated: Jan 30, 2019, 10:42 AM IST
भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताच्या क्रमांकात सुधार, चीन-पाकिस्तानमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार  title=

नवी दिल्ली : जगभरातील भ्रष्ट देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या स्थितीत सुधार पाहायला मिळतोय. 180 देशांच्या यादीत भारताच्या 3 जागेंमध्ये सुधार आला आहे. या नव्या यादीनुसार भारत 78 व्या स्थानी पोहोचला आहे. रशिया, चीन आणि पाकिस्तान सहित 102 देशांमध्ये जास्त भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमालिया जगातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचार विरोधी संघटना 'ट्रांस्फरंसी इंटरनॅशनल'ने 'जागतिक भ्रष्टाचार यादी 2018' जाहीर केली आहे. भ्रष्टाचार कमी असलेल्यांना या यादित पहिले स्थान आहे. या यादीनुसार डेन्मार्क हा पहिल्या स्थानी आहे. याचा अर्थ डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. तर भारत 78 व्या स्थानी आहे. याआधी 2017 मध्ये आलेल्या यादीनुसार भारत 81 व्या स्थानी होता. म्हणजे एका वर्षाच्या आत भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतामध्ये सुधार झालेला या यादीत तरी दिसतोय. हा सुधार खूप सर्वसाधारण आहे. 2017 मध्ये भारताला 40 गुण मिळाले होते. यावेळी भारताच्या खात्यात 41 गुण मिळाले. एका गुणाच्या बढतीने भ्रष्ट देशांच्या यादीत भारत खाली आला आहे.

चीन आणि पाकची स्थिती 

भारताच्या गुणक्रमात सुधार पाहायला मिळत असताना शेजारी राष्ट्र असलेल्या चीन आणि पाकिस्तानची  स्थिती खूपच खराब आहे. या यादीमध्ये चीन 87 व्या स्थानी आहे. पाकिस्तानची स्थिती तर सर्वात वाईट आहे. 180 देशांच्या यादीत पाक 117 व्या स्थानी आहे.

सोमालिया सर्वात भ्रष्ट

भ्रष्टाचारच्या प्रकरणात सोमालियाची स्थिती सर्वात खराब आहे. जर डेन्मार्क हा यात सुधार आलेला देश आहे.  त्यानंतर न्यूझीलॅंड, फिनलॅंड, सिंगापूर, स्वीडन आणि स्वित्झरलॅंडचा क्रमांक लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राज्यात अमेरिकेची स्थिती खूपच खराब झाली. यावर्षी अमेरिकेला 70 पॉईंट्स मिळाले आणि टॉप 20 देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला. या वर्षी अमेरिकेचा रॅंक 22 आहे, जो याआधी 18 होता. 2011 नंतर अशी पहिली वेळ आहे जेव्हा अमेरिका यादीतील 'टॉप 20'मधून बाहेर फेकली गेली आहे. या जागतिक भ्रष्टाचार यादीमध्ये साधारण दोन तृतीयांशहून जास्त देशांना 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहे. यांची सरासरी 43 येत आहे.