Shocking News : हा कसला भयानक खेळ? लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोरा बांधला आणि...

दिल्लीतील किडवईनगर परिसरात असलेल्या नवी दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत  हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  काही टवाळ मुलांच टोळक शाळेत खेलत होत. यावेळीया टोळक्याने एका आठ वर्षाच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला नायलॉनचा दोरा बांधला. हा दोरा खेचून या टोळक्याने मुलासह मस्ती केली.

Updated: Dec 31, 2022, 04:49 PM IST
Shocking News : हा कसला भयानक खेळ? लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोरा बांधला आणि... title=

Shocking News : लहान मुल म्हणजे देवा घरची फुलं अशी म्हण आहे. मात्र, काही मुलं इतकी अतरंगी असतात की त्यांचात निरागसपणा कुठेच दिसत नाही. असा मुलांमुळे पालक त्रस्त होतात. तर, इतरासांठी देखील अशी मुलं उद्रवी ठरतात. दिल्लीत(Delhi) अशीचएक धक्कादायक घटना घडली आहे. काही मुलांनी शाळेत खेळता खेळता लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टला( private part ) दोरा बांधला. यात या मुलाला दुखापत झाली(Shocking News ).

दिल्लीतील किडवईनगर परिसरात असलेल्या नवी दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत  हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  काही टवाळ मुलांच टोळक शाळेत खेलत होत. यावेळीया टोळक्याने एका आठ वर्षाच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला नायलॉनचा दोरा बांधला. हा दोरा खेचून या टोळक्याने मुलासह मस्ती केली.

दुसऱ्या दिवशी मुलाला आंघोळ घालत असताना हा प्रकार त्याच्या आईच्या निदर्शानास आला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला विचारले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. आईने तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. तात्काळ मुलावर उपचार सुरु करण्यात आले. दोऱ्याने ओढला गेल्यामुळे या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली आहे.

यानंतर मुलाच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शाळेत दाखल होत चौकशी केली. तसेच शाळा प्रशासना देखील चांगलेच धारेवर धरले. लहान मुलासह असा प्रकार घडत असताना शाळेतील शिक्षक, शिपाई आणि इतर कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रायव्हेट पार्टला दोरा बांधणाऱ्या मुलाचा शोध सुरु केला आहे. पीडित मुलाला त्रास देणारी मुलं त्याच्याच वयाची आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.   शालेय विद्यार्थांमध्ये विकृती वाढत असल्याचे या प्रकारावरुन दिसत आहे.  लहान मुलांचे योग्य समुपदेशन करण्याची गरज आहे.