सीमेवर अशी साजरी झाली दिवाळी

लष्कराच्या आणि निमलष्कराच्या विविध तैनात बटालियनच्या जवानांनी उत्साहात दीपोत्सव साजरा केला

Updated: Oct 27, 2019, 02:55 PM IST
सीमेवर अशी साजरी झाली दिवाळी
फोटो सौजन्य : एएनआय

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या आणि निमलष्कराच्या विविध तैनात बटालियनच्या जवानांनी उत्साहात दीपोत्सव साजरा केला. जवानांनी लक्ष्मीपूजन केलं. एकमेकांना मिठाई भरवली आणि फटाकेही उडवले. राजौरीत शालेय विद्यार्थ्यांनी जवानांसह दिवाळी साजरी केली. शालेय विद्य़ार्थ्यांनी जवानांना भेटवस्तूही दिल्या. 

आपल्या घरादारापासून, कुटुंबापासून दूर राहत देशाचं रक्षण करणारे सैनिक दिवाळीसारखा महत्त्वाचा सणही आपल्या कुटुंबासह साजरा करू शकत नाहीत. पण आपापल्या कॅम्पमध्ये मात्र आपल्या सहकाऱ्यांसह ते दिवाळी साजरी करतात. 

श्रीनगरच्या शरिफाबाद कॅम्पमधल्या सैनिकांनी भजन किर्तन करत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूही देण्यात आल्या. यावेळी त्यांनी सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.  

  

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सहाव्या वेळी जवानांसोबत दिवळी साजरी करण्यासाठी राजौरी येथे दाखल झाले आहेत. अनुच्छेद ३७० काढून टाकल्यावर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच एलओसीलगतचा दौरा आहे. आधीच्या कार्यकाळात पाचही वर्षे पंतप्रधानांनी जवानांसह दिपावली साजरी केली.