ती ओरडत होती, नराधम जंगलात ओढून नेत होते

उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव जिल्हा पुन्हा एकदा  हादरला आहे.  

Updated: Jul 6, 2018, 11:39 PM IST
ती ओरडत होती, नराधम जंगलात ओढून नेत होते title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव जिल्हा पुन्हा एकदा  हादरला आहे. येथील गंगाघाट भागातील एक अत्यंत संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तीन तरुण एका महिलेला जबरदस्ती ओढून नेताना दिसत आहेत. पोलिसांनी व्हिडीओवरून आरोपींची ओळख पटवली असून दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर योगी सरकारचा धाक नसल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणातील आरोपी विपीन, रितीक, आकाश, विमल आणि गंगाघाट भागातील बाबाखेडा येथील रहिवासी राहुल याच्याविरोधात ३१२/१८, १४७, ३२३, ५०४, ५०६, ३५४क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, हा व्हिडीओ दोन ते अडीच महिन्यांपूर्वीचा असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी राहुल आणि अन्य एका आरोपीला अटक केली आहे.  

व्हिडीओमध्ये तीन नराधम एका महिलेचे अपहरण करतात आणि तिला जंगलामध्ये घेऊन जाताना दिसत आहे. या दरम्यान पीडित महिला नराधमांकडे दयेची भीक मागताना दिसत आहे, परंतु याकडे कानाडोळा करून ते तिला जंगलामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पीडित नराधमांना ‘भैय्या भैय्या कृपया असे कृत्य करू नका’, अशी याचना करताना दिसत आहे. त्याचवेळी आरोपी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेत.