Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे.

Updated: Jul 31, 2021, 05:00 PM IST
Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

मुंबई : इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख जवळ येत आहे. त्यात इनकम टॅक्सचे अनेक नियम बदलत असल्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे लोकांच्या मनात घरांच्या मालमत्तेसंदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असतील. त्यात लोकांना एक प्रश्न नक्की पडत असणार की, समजा एका व्यक्तीच्या नावावर तीन घरे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्या सर्व घरात राहतात. कोणतेही घर भाड्याने दिले जात नाही. अशा परिस्थितीत त्यांना कर द्यावे लागेल का?

यासंदर्भात, आयकर विभाग म्हणतो की, कर दायित्व 2020-21 च्या मूल्यांकन वर्षासाठी केले जाईल. नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या मालकीच्या घरांच्या मालमत्ता म्हणून दोन घरांवर सूट मिळू शकते. दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे. म्हणजेच, दोन घर घेतल्यानंतर, तिसरा घर डीम्ड प्रॉपर्टीज मानला जाईल.

2019 च्या अर्थसंकल्पापूर्वी, दुसऱ्या घराला डीम्ड प्रॉपर्टी मानले जात होते. पण आता हा दर्जा तिसऱ्या घराला देण्यात आला आहे. तुम्ही राहता त्या दोन घरांच्या भाड्यावर टॅक्स लागणार नाही. पण लोकांचे तिसरे घर मात्र या वर्गात येईल.

फार्महाऊसचे नियम काय आहेत?

आता एक असा देखील प्रश्न लोकांच्या मनात येतो की, एखाद्या व्यक्तीची दोन घरे आहेत, ज्यात एक फार्महाऊस देखील आहे. ज्यात ते वीकेंडला जातात. दुसरे घर हे शहरात आहे, जेथे ते आठवड्यातून 5 दिवस राहतात. दोन्ही मालमत्ता ऑक्युपाइड श्रेणीत ठेवल्या जातील का? इनकम टॅक्सनुसार, दोन्ही मालमत्तांना स्वत: च्या मालकीची मालमत्ता मानली जाऊ शकत नाही आणि त्यावर कर सूट देखील मिळू शकत नाही.

यामध्ये, एक घर स्वत: च्या मालकीचे मानले जाईल, ज्यावर कर सूट घेता येईल. परंतु दुसरे घर डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी अंतर्गत येईल. त्यानुसार यावर कर भरावे लागेल.

दोन मजल्यांच्या घराचे नियम

बऱ्याचदा लोकांकडे दोन मजल्यांचे घर देखील असतात. ज्यामध्ये मालकाचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते आणि तळमजला भाड्याने दिला जातो. तर अशावेळी हे 'इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी'मध्ये येत नाही. म्हणजेच दुकानाच्या कमाईला घराच्या कमाईशी जोडले जाऊ शकत नाही. या दोघ्यांचेही नियम वेगळे आहे.

परंतु तळमजल्यावर चालणाऱ्या दुकानाची कमाई 'बिझनेस प्रोफेशन' च्या स्लॅबमध्ये ठेवली जाईल. त्यानुसार, तुम्हाला ITR मध्ये सांगावे लागेल आणि कर भरावा लागेल.

या अंतर्गत तुम्हाला व्यवसायाचे फायदे आणि तोटे पाहावे लागतील. याशिवाय, पहिला मजला स्वत: च्या मालकीची मालमत्ता मानला जाईल आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. तुम्ही स्वतः यात राहता, त्यामुळे घरगुती मालमत्तेचे उत्पन्न शून्य मानले जाईल.

इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टीचा अर्थ काय?

जर तुम्ही तळमजला व्यवसायासाठी भाड्याने दिला असेल, तर त्यावर कर भरावा लागेल. हे दुकान 'इनकम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी' अंतर्गत येईल. दुकानातून मिळणारी कमाई तुमच्या कमाईमध्ये समाविष्ट केली जाईल. यामध्ये तुम्हाला एकूण भाड्यात दिलेला खर्च वजा करावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही त्या मालमत्तेसाठी घर कर किंवा महापालिका खर्च वगैरे भरत असाल तर ते वजा करता येईल. त्यानंतर मिळवलेले निव्वळ उत्पन्न कर उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाते.

जर तुमच्याकडे दोन घरे असतील आणि एकाला भाड्याने दिले असेल. जर तो मालक स्वतः दुसऱ्या घरात राहत असेल, तर एका घरात उत्पन्न शून्य मानले जाईल. दुसऱ्या घराच्या बाबतीत, वाजवी भाडे कमाई मानले जाईल आणि त्यानंतर कर नियम लागू होतील. त्यानुसार कर भरावा लागेल.