'या' Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही

Tax Saving Investments: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकदा काही संकल्प ठरवले जातात. त्यातलाच एक संकल्प म्हणजे आर्थिक नियोजनाचा.   

सायली पाटील | Updated: Jan 9, 2024, 10:54 AM IST
'या' Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही title=
Income Tax SIncome Tax Saving Schemes in marathi latest update aving Schemes in marathi latest update

Tax Saving Investments: आर्थिक नियोजन (Financial Planning) ही अनेकांपुढं उभी राहिलेली एक मोठी समस्या आहे. मेहनतीनं कमवलेले पैसे योग्य ठिकाणी (investment) गुंतवण्यापासून त्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं असल्यामुळं हल्लीची पिढीसुद्धा उधळपट्टीपासून दुरावा पत्करताना दिसत आहे. सध्या या पिढीचं प्राधान्य दिसत आहे ते म्हणजे आर्थिक नियोजनाला. त्यातही दरवर्षीप्रमाणं अनेकजण यंदाही Income Tax Saving Schemes च्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

आपल्या वेतनातील (Salary) मोठा भाग कराच्या रुपात न देता तो योग्य ठिकाणी गुंतवणून त्याचा फायदा मिळवण्यासाठी आणि अर्थातच Tax Planning करण्यासाठी अनेकजण सध्या तज्ज्ञ आणि जाणकारांचा सल्ला घेताना दिसत आहेत. तुम्हीही अशाच काही योजनां पाहताय का? हे घ्या त्यासाठीचे पर्याय... 

ELSS 
म्‍यूचुअल फंड्स (Mutual Fund)च्या इक्विटी लिंक्‍ड सेविंग्‍स स्‍कीम्‍स (ELSS) मध्ये एक असाही पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. इथं तुम्ही सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर बचत साध्य करू शकता. ही एक लॉक इन पिरियड योजना आहे. 

SSY
तुम्हाला एखादी मुलगी असेल तर तिच्या भवितव्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेमधील ठेवींवर 8.2 टक्क्यांचं व्याज दिलं जात आहे. या योजनेतून तुम्हाला एक चांगली रक्कम परताव्याच्या स्वरुपात मिळण्यासोबतच 80C अंतर्गत वर्षाला तुम्ही 1.5 लाख रुपयांची कर सलवलत मिळवू शकता. 

हेसुद्धा वाचा : सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार

 

PPF
Public Provident Fund किंवा पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला परताव्याची हमखास संधी असते. यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित असते. दर 15 वर्षांनी पीपीएफ खातं मॅच्युअर होतं. सध्याच्या घडीला या खात्यावर 7.1 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेतील संपूर्ण गुंतवणूक, व्याज आणि परतावा करमुक्त आहे. 

NPS
करसवलत मिळवण्यासाठी तुम्ही National Pension System अर्थात एनपीएसमध्येही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 80C आणि 80CCD(1B) अंतर्गत 50 हजार रुपयांची कर सवलत मिळते. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. 

NSC
National Savings Certificate म्हणजेच NSC हीसुद्धा एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे. यामध्ये तुम्ही 1000 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करू शकता. सध्या या योजनेमध्ये 7.7 टक्क्यांचं व्याज दिलं जात आहे. 80C अंतर्गत या सवलतीमध्ये फायदा मिळतो.