नवी दिल्ली : चीन (China) भारतात घुसघोरी करण्याचा प्रयत्नात होता. लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा डावा होता. एलएसी बदलण्याचा प्रयत्न करण्याचा इरादा होता. आणि भारत (India) काहीही करू शकणार नाही, अशी चीनची धारणा होती. मात्र, चीन हे विसरला आहे की तो १९६२ चा भारत नाही. हा २०२० चा न्यू इंडिया आहे, ज्याने प्रत्येक युद्धाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. न्यू इंडियाचा संकल्प असा आहे की जर आपण छेडले तर आम्ही सोडणार नाही. डोकलाम ते गलवान खोऱ्यापर्यंत चीनला याचा पुरावा मिळाला आहे.
पहिला पर्याय - चीनविरूद्ध कठोर कारवाईची रणनीती बनविणे
दुसरा पर्याय - चीन एलएसीला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणे
तिसरा पर्याय - चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय दबाबचा भाग म्हणून जे देश चीनच्या विरोधात आहेत त्यांना भारताबरोबर एकत्र आणणे
चौथा पर्याय - भारतीय नौदलाने चीनविरोधात पावले उचललने. समुद्रावर घेराव घालून दबाव आणणे आणि चीनशी तडजोड करण्यास भाग पाडले पाडणे
पाचवा पर्याय - भारताने चीनविरुद्ध सूड उगवायला हवे, त्यांच्या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देणे
२० ऑक्टोबर १९७५ रोजी अरुणाचल प्रदेशच्या तुळंग ला येथे चीनने आसाम रायफलच्या पेट्रोलिंग पथकावर फसवणूक हल्ला केला होता. यात भारताचे चार सैनिक शहीद झाले. म्हणजेच चीननेही आपल्याला धोका दिला आहे. आता पुन्हा एकदा हिंसक घटना पुढे येत आहेत. परंतु आता चीन ही वाकडी चाल भारत सरळ करणार आहे, तसा इशारा भारताकडून देण्यात आला आहे.