विमान प्रवासात हरवली बॅग, शोधण्यासाठी प्रवाशाने केलं असं काही... विमान कंपनीला बसला धक्का

विमान प्रवासादरम्यान एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची बॅग दुसऱ्या प्रवाशासोबत बदली झाली, आपली बॅग शोधण्यासाठी त्याने लढवली शक्कल

Updated: Mar 31, 2022, 02:42 PM IST
विमान प्रवासात हरवली बॅग,  शोधण्यासाठी प्रवाशाने केलं असं काही... विमान कंपनीला बसला धक्का title=

बंगळुरु :  प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानाच्या बॅग हरवण्याच्या किंवा बदलण्याच्या घटना अेकदा ऐकायला मिळतात.  अशावेळी प्रवासी कस्टमर केअर सेंटरला फोन करतात आणि याबाबतची माहिती देतात. काही वेळा त्या प्रवाशाचं गहाळ झालेलं सामान मिळत, तर काही वेळा त्याला निराश व्हावं लागतं. 

अशाच एक घटनेत एका व्यक्तीची विमान प्रवासादरम्यान सामानाची बॅग बदली झाली. पण या प्रवाशाने आपली बॅग शोधण्यासाठी असं काही केलं की सामान्य माणूस विचारच करु शकत नाही. 

विमान प्रवासात काय घडलं?
सॉफ्टवेअर अभियंता नंदन कुमार या व्यक्तीने पाटणा ते बंगळुरूला इंडिगोच्या विमानाने प्रवास केला. प्रवास संपवून तो घरी पोहोचला. पण नंदन कुमारच्या हातातली बॅग वेगळीच असल्याचं त्याच्या पत्नीने पाहिलं आणि हे तिने त्याच्या लक्षात आणून दिलं. नंदन कुमारने चुकीने दुसऱ्याच प्रवाशाची बॅग आणली होती. 

कस्टमर केअरला दिली माहिती
नंदन कुमारने तात्काळ इंडिगोच्या कस्टमर केअरला बॅग बदली झाल्याची माहिती दिली. पण कस्टमर केअर सेंटरकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा नंदन कुमारने केला. बॅग हरवल्याची आणि नंतर ती सापडल्याची संपूर्ण घटना नंदनने ट्विटरवर सांगितली आहे.

विमान कंपनीकडून मदत मिळाली नसल्याचा दावा
विमान कंपनीच्या कस्टर केअरकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नंदन कुमार नाराज झाला. मग त्याने आपली बदली झालेली बॅग शोधण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. नंदन कुमारने इंडगोची वेबसाईटच हॅक करण्याचा निर्णय घेतला. 

प्रवाशाचा संपर्ण तपशील काढला
नंदनने इंडिगोची वेबसाठी हॅक करुन लॉग रेकॉर्ड तपासला.  ज्या प्रवाशासोबत बॅगची अदलाबदल झाली होती, याची माहिती काही वेळातच त्याला मिळाली. या प्रवाशाचा संपूर्ण तपशील त्याने काढला. 

नंदन कुमार यांनी इंडिगोला दिली सूचना
ज्या प्रवाशासोबत बॅग बदली होती तो नंदन कुमार याच्या घराजवळ राहत होता. नंदनने त्या प्रवाशासोबत संपर्क साधून घडलेली माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॅग अदलाबदली करुन घेतल्या. 

बॅग मिळाल्यानंतर नंदन कुमार यांनी विमान कंपनीला ग्राहक सेवा सुधारण्याची गरज असल्याचं सुचवलं. तसंच, ग्राहकांचा डेटा लीक होऊ नये यासाठी वेबसाइट अधिक सुरक्षित करण्याचा सल्लाही दिला.