कोरोना संकटात भारत स्वावलंबी, आता 'या' गोष्टीसाठी चीनवर अवलंबून नाही

 पीपीई कीटचे उत्पादन करण्यास भारताने सुरुवात केली. 

Updated: May 8, 2020, 04:59 PM IST
कोरोना संकटात भारत स्वावलंबी, आता 'या' गोष्टीसाठी चीनवर अवलंबून नाही  title=

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच देशांचे नुकसान झाले. भारताची अर्थव्यवस्था देखील ठप्प झाली. पण या कोरोना संकटाने भारताला मात्र स्वावलंबी बनवले आहे. भारत हा पीपीई कीटसाठी पूर्णपणे चीनसह इतर देशांवर अवलंबून होता. पण गेल्या दोन महिन्यात कोरोनाने भारताला असा काही धडा दिला की, पीपीई कीटचे उत्पादन करण्यास भारताने सुरुवात केली. केवळ सुरुवातच केली नाही तर या क्षेत्रात ठळक अशी कामगिरी देखील केली आहे. 

मार्चच्या आधी भारतात क्लास ३ लेव्हल पीपीई कीट बनत नव्हते. तसेच फेब्रुवारी २०२० पर्यंत भारतात स्टॅंडर्ड पीपीई कीट बनत नव्हते. पण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. भारताने विदेशातून ५२ हजार कीट मागवले होते. पण हे विदेशी कीट देखील कमी पडू लागले. पण आता भारतदेखील या युद्धात पूर्ण ताकदीनीशी उतरला आहे. 

अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांमध्ये पीपीई कीट मोठ्या प्रमाणावर बनवली जातं असतं आणि भारत त्यांच्याकडून आयात करत असे. पण आता भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची पीपीई कीट बनवू लागलाय. पीपीई कीट उत्पादनाबाबबत बोलायचे झाल्यास भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. 

भारतात WHO च्या निर्देशानुसार १०६ उत्पादक कीट बनवले जात आहेत. यासोबतच उत्तम दर्जाचे कीट उत्पादन भारतात सुरु आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात पीपीई कीट बनवण्यासाठी भारताला WHO कडून हिरवा कंदील मिळाला.

अनेक एअरलाईन्स कंपन्यांकडून सरकारकडे पीपीई कीटची मागणी येत आहे. भारतात पीपीई कीटच्या व्यवसाय आता ७००० कोटी रुपयांवर गेलाय. येणाऱ्या दिवसांमध्ये हा व्यवसाय अधिक वाढणार असल्याचे तज्ञ सांगतात.