...म्हणून भारतात ५ वर्षांनी कमी होतंय नागरिकांचं आयुर्मान

सरासरी प्रत्येक नागरिक ...

Updated: Jul 31, 2020, 02:20 PM IST
...म्हणून भारतात ५ वर्षांनी कमी होतंय नागरिकांचं आयुर्मान  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारताच्या जवळ जवळ २५% लोकसंख्येवर वायु प्रदूषणाचे वेगवेगळे दुष्परिणाम होतात. जगातील कोणत्याच देशाची लोसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषणाने प्रभावित होत नाही. एपिक ए.क्यू.एल.आय (AQLI) किंवा वायु गुणवत्ता जीवन सुचंकावरील माहिती पाहिल्यास समझते की जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मापकांअंतर्गत भारताची कामगिरी खराब आहे. यामुळे, एपिकने दिलेल्या नवीन माहितीनुसार, भारतातील लोकांचे आयुर्मान खराब हवा गुणवत्तेमुळे तब्बल ५ वर्षांनी कमी होत आहे. म्हणजेच, सरासरी प्रत्येक नागरिक वायु प्रदूषणामुळे आपले जीवन ५ वर्षांनी कमी जगतो.

जरीही सध्या जागतिक पातळीवर कोरोना महामारीच्या लसीच्या शोधाने प्राथमिकता घेतली असेल, तरीही कणसंबंधी पदार्थ उत्सर्जनाने जागतिक पातळीवर अरबोच्या संख्येत लोकांच्या तब्येतीवर परिणाम केला आहे. शिकागो विद्यापीठाच्या एपिक या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अति सूक्ष्म असे कणसंबंधी पदार्थाचे कण, अर्थात particulate matter, हे हवेत बराच काळ तरंगत राहतात आणि मनुष्याच्या श्वसननलिकेतून शरीरात पसरून वेग वेगळ्या रोगांना आमंत्रण देतात. 

कोविड १९ महामारी पसरण्याअगोदर पासून कणसंबंधी पदार्थ उत्सर्जन आणि त्याने होणाऱ्या वायु प्रदूषणामुळे लाखोंच्या संख्येत लोकांचे बळी गेले आहेत. त्या मुळे जरीही कोविड १९ महामारी वर उपचार निघाला आणि कोरोना बरा करता आला तरीही वायु प्रदूषण आणि त्यामुळे लोकांच्या तब्येतीवर होणारे हानिकारक परिणाम हे कायम राहतील.

एपिकच्या रिपोर्टनुसार, मागील दोन दशकांत भारतात कणसंबंधी पदार्थांच्या उत्सर्जनात ४२% नी वाढ झाली आहे. देशात ८४% लोकं या क्षेत्रांत राहतात जिकडची हवा गुणवत्ता भारतीय मापकांच्या तुलनेत सुद्धा खूप खराब आहे. तसेच देशातील निव्वळ जनसंख्या, ही जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मापकांपेक्षा बऱ्याच खराब दर्ज्याच्या हवेत श्वास घेते. जिथे जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मापकांच्या मान्यतेनुसार देशवासीयांचे ५ वर्षे आयुर्मान कमी होत आहे, तिथे भारतीय मापकानुसार सुद्धा लोकांचे आयुर्मान २ वर्षे कमी होतंच आहे. 

उत्तर प्रदेश राज्याचे उदाहरण पाहता समझते कि जवळ जवळ २१ कोटी लोक हे खराब हवे मध्ये श्वास घेत असून आपल्या आयुष्याची ८ वर्षे गमवून बसत आहेत. महाराष्ट्रात ही संख्या ३.१ वर्षे एवढी आहे. एपिकच्या रिपोर्ट अनुसार बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यात सुद्धा लोकं ७ वर्षे कमी जगात आहेत. तसेच हरियाणा मध्ये लोकांचे आयुर्मान वायु प्रदूषणामुळे ८ वर्षे कमी झालेले दिसते. राजधानी नवी दिल्लीत ९.४ वर्षे, महाराष्ट्रातील पुणे येथे ३.४ वर्षे, नाशिक ३ वर्षे, ठाणे ३.४ वर्षे, औरंगाबाद ३.१ वर्षे, चंद्रपूर ३.३ वर्षे, नागपूर ३.५ वर्षे, मुंबई शहर ३.२ वर्षे, मुंबई उपनगर ३.५ वर्षे, कोल्हापूर २.४ वर्षे व पालघर ३.१ वर्षे एवढे आयुर्मान कमी होत आहे. 

कोविड १९ बरोबर वायु प्रदूषण कमी करण्याची तत्काळ गरज – प्राध्यापक मायकेल ग्रीनस्टोनमिल्टन फ्राईडमन प्राध्यापक आणि एपिकचे निर्देशक आणि अर्थशास्त्री मायकेल ग्रीनस्टोन म्हणतात, “कोरोना वायरस पासून धोका आहेच. त्यावर जगभरात गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. पण अनेक ठिकाणी तितक्याच गंभीरतेने वायु प्रदुषणाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. लाखो करोडो लोकांना त्यांचे आयुष्य पूर्णपणे जगण्याची संधी व स्वच्छ हवेत श्वास घेणेही तितकेच गरजेचे आहे.” ग्रीनस्टोन ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिकागो विद्यापीठाच्या एपिक द्वारे ए क्यू एल आय ची स्थापना केली. 

२०१९ साली वायु प्रदूषणाविरोधी लढ्यात भारतीय शासनाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात NCAP ची घोषणा केली. यानुसार भारतात ची हवा गुणवत्ता साल २०२४ पर्यंत २० ते ३० टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष दिले गेलेले आहे. भारत हे लक्ष गाठण्यात सक्षम आहे पण ए क्यू एल आय वरील माहिती प्रमाणे, ह्यासाठी देशातील स्वास्थ्य व्यवस्थेत सुधार करणे सुद्धा अतिआवश्यक आहे. जर २०२४ पर्यंत भारतात वायु प्रदूषण २५%नी कमी करता आले, तर राष्ट्रीय आयुर्मानात १.६ वर्षांनी वाढ होईल.