India Railway Budget 2023: रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं वाचावी ही बातमी, तुमच्यावर होणार थेट परिणाम

India Railway Budget 2023: भारतामध्ये दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे अत्यंत महत्त्चाची भूमिका बजावताना दिसते. देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात या सेवेचा उपभोग घेतात. त्यामुळं ही बातमी महत्त्वाची   

Updated: Jan 23, 2023, 10:57 AM IST
India Railway Budget 2023: रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं वाचावी ही बातमी, तुमच्यावर होणार थेट परिणाम
India Railway Budget 2023 new train track new trains and many more

India Railway Budget 2023: देशाच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी आणि अशक्य ठिकाणांवरही नागरिकांना सहजपणे पोहोचवणारी एक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे (Indian Railways). समाजातील प्रत्येक वर्गाला त्यांच्या खिशाला परवडेल अशा फरकानं इथं प्रवास करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काळ जसजसा पुढे गेला तसतशी रेल्वेही (Railways) प्रगत झाली. तिच्यामध्ये काही बदलही झाले. आता याच बदलांचा टप्पा आणखी पुढे जाणार आहे, कारण ठरतंय ते म्हणजे यंदाच्या वर्षीचं Railway Budget. 

1 फेब्रुवारीला देशाच्या (Finance minister) अर्थमंत्री निर्मला सीतारमण पाचव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. केंद्रात सत्तारुढ झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मोदी सरकारनं रेल्वे बजेटचा समावेश देशाच्या मुख्य अर्थसंकल्पामध्ये करून घेतला. यंदाच्या वर्षी रेल्वेसाठी केंद्राकडून काही खास तरतुदी करण्यात येणार असल्याचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी रेल्वे मंत्रालयाला सरकारकडून 2 ट्रिलियन इतका निधी मिळू शकतो. थोडक्यात प्रवाशांनाही याचा थोडाथोडका फायदा होणार हे निश्चित. 

यंदाचा अर्थसंकल्प निर्णायक भूमिका बजावणार... 

2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळं यंदाचं वर्ष खास आहे. त्यातच 2023 या वर्षात गेशातील 10 राज्यांमध्ये निवडणुकाही आहेत. त्यामुळं यावेळी सर्वसामान्यांना केंद्रस्थनी ठेवत रेल्वे विभागातही काही खास आणि जादा रेल्वे गाड्यांची आणि सोयीसुविधांची बरसात नागरिकांवर केली जाऊ शकते. राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा, त्रिपुरा, मेघालय, नगालँड आणि मिझोरम या राज्यांमध्ये रेल्वेसंदर्भातील निर्णय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. 

भारतात येतोय नवा रेल्वेमार्ग? 

येत्या काळात देशात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर आणि हाय स्पीड पॅसेंजर कॉरिडोर सुरु करण्यासोबतच मल्टीट्रॅकिंग आणि सिग्नलिंग अपग्रेडेशनवर भर देण्यात येईल. शिवाय देशात नव्या रेल्वे मार्गाची आखणीही करण्यात येऊ शकते. पुढील आर्थिक वर्षामध्ये जवळपास 4000 किमी लांबलचक रेल्वे रुळाचं जाळ पसरवण्याचं रेल्वे विभागाच्या दृष्टीक्षेपात आहे. यासाठी साधारण 15-20 लाख कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. 

हेसुद्धा पाहा : Zee 24 Taas Exclusive | 2023चा अर्थसंकल्प नव्या संसद भवनात मांडला जाणार?

 

यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी त्यामध्ये रेल्वे विभागामध्ये प्रामुख्यानं वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि वंदे भारत 2.0 चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. ही रेल्वे राजधानी एक्स्प्रेससारख्याच सुविधा देईल. यामध्ये एसी कोचसुद्धा असतील. 2023 च्या रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पामध्ये 500 वंदे भारत, 35 हायड्रोजन ट्रेन, 5000 एलएचबी कोच, 58000 वॅगनसाठी 2.70 लाख कोटी रुपये अशा मोठमोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.