रस्ते बांधकामात भारतानं रचला विश्वविक्रम, गडकरींच्या खात्याने केली कमाल

नितीन गडकरी यांच्या खात्याने पुन्हा एकदा कमाल केली आहे. 

Updated: Jul 20, 2021, 08:48 PM IST
रस्ते बांधकामात भारतानं रचला विश्वविक्रम, गडकरींच्या खात्याने केली कमाल

मुंबई : कोरोनाच्या काळात देशात राष्ट्रीय महामार्गांचा सुकाळ पाहायला मिळाला. 2020-21 या वर्षात दररोज 36.5 किमी रस्त्यांचं बांधकाम झालं. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींनी ही माहिती दिली. 24 तासात चार मार्गिकांचा अडीच किलोमीटर रस्ता बनवून भारतानं विश्वविक्रम रचला आहे. 

गडकरी म्हणाले की, भारताने अवघ्या 24 तासात अडीच किमी फोर लेन काँक्रीट रोड पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. याशिवाय केवळ 21 तासांत 26 किलोमीटर एक लेन बिटूमेन रोडचे काम पूर्ण झाले आहे.

'बांधकामाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात कंत्राटदारांना पाठिंबा, कराराच्या तरतुदी शिथिल करणे, उप-कंत्राटदारांना थेट देयके आणि साइटवरील कामगारांसाठी खाण्यापिण्याशिवाय वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे.'

या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या निकषानुसार बांधकाम सुरू असल्याचे गडकरी म्हणाले.