#IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा

भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता हल्ला 

Updated: Mar 3, 2019, 07:37 AM IST
 #IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा  title=

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे जाऊन केलेल्या हवाई हल्ल्यात एकूण ४० ते ५० दहशतवद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका इटालियन महिला पत्रकाराले 'विऑन' या इंग्रजी वृत्तवाहिनीला याविषयीची माहिती दिली. अधिकृतांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. 

जाणून घ्या : बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

फ्रान्सेसा मरिनो यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हल्ल्यातील मृतांच्या आकड्याची अधिकृ माहिती त्यांना मिळाली असून, यात जखमींची संख्या ३५ ते ४० च्या घरात आहे. हल्ला झालेल्या परिसरात राहणाऱ्याच एका व्यक्तीकडून त्यांना याविषयीची माहिती देण्यात आली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचं सडेतोड उत्तर या ह्ल्यातून देण्यात आल्याचं म्हटलं गेलं. सुरुवातीला या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होती अशी माहिती समोर आली होती. ज्यानंतर हल्ल्यात तीनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला गेल्याची चर्चाही झाली. तर, पाकिस्तानकडून मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. 

आपल्याला हल्ल्याविषयीची शंभर टक्के अधिकृत माहिती मिळाल्याचं सांगत त्यांनी हा आकडा उघड केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्या. ज्याच्या चालकांचे फोन त्यावेळी काढून घेण्यात आले. पुढे त्या ठिकाणहून मृतदेह बाहेर नेण्याचं काम सुरु झालं. ज्या भागात हा हल्ला करण्यात आला त्यानजीकच्या स्थानिकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण आहे. पण, त्यामुळे त्या ठिकाणहून फार माहिती मिळवणंही आव्हानात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

मृतांमध्ये पाकिस्तान सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश 

मृतांमध्ये १२ युवकांचाही समावेश होता जे त्यावेळी प्रशिक्षण घेण्यासाठी या तळावर हजर होते. पाकिस्तान सैन्यदलातील निवृत्त कर्नल सलीम यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून, कर्नल झरकार झकारी यात गंभीर जखमी झाल्याची माहितीली मरिनो यांनी दिली. भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात जैश...मध्ये प्रशिक्षक पदावर असणारा मुफ्ती मोईन आणि बॉम्ब एक्सपर्ट उस्मान घानीचाही खात्मा करण्यात आला.