पीओकेमधील दहशतवादी तळ उद्धस्त

 दहशतवाद्यांचे अनेक लॉंच पॅड उद्धस्त झाले आहेत.

Updated: Oct 20, 2019, 12:01 PM IST
पीओकेमधील दहशतवादी तळ उद्धस्त

नवी दिल्ली : तंगधर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दहशतवाद्यांचे अनेक लॉंच पॅड उद्धस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करमध्ये हा हल्ला केला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

भारतीय सीमारेषेजवळ पाकिस्तान नेहमी कुरापत्या करत असतो. पाकिस्तानतर्फे सीमारेषेचे उल्लंघन करत कुपवाडा आणि कठुआ सेक्टरमध्ये गोळीबारही करण्यात आला. यामध्ये २ जवान शहिद झाले. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. यामध्ये ३ भारतीय नागरिक जखमी झाले.