भारतीय सैन्यात निघाली भरती; कुठे पाठवाल अर्ज? किती पगार? सर्वकाही जाणून घ्या

Indian Army SSC Tech:

Pravin Dabholkar | Updated: Jul 17, 2024, 12:08 PM IST
भारतीय सैन्यात निघाली भरती; कुठे पाठवाल अर्ज? किती पगार? सर्वकाही जाणून घ्या  title=
Indian Army Job

Indian Army SSC Tech: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हाला भारतीय सैन्यात नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. येथे तुम्हाला चांगले पद आणि पगार मिळू शकतो. भारतीय सैन्याच्या माध्यमातून शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक पदासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यासाठी 16 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्जदारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक (64TH SSC (TECH) MEN & 35th SSC (TECH) WOMEN (APR 2025) भरती अंतर्गत एकूण 381 रिक्त जागा भरली जाणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन 64 (पुरुष) अंतर्गत एकूण 350 रिक्त पदे भरली जातील. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन 35 (महिला) ची एकूण 29 रिक्त पदे भरली जातील.एसएससी (W) टेक्निकलचे 1 पद आणि एसएससी (W) नॉन टेक्निकल, नॉन यूपीएससीचे 1 पद भरले जाणार आहे.

या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरु शकतात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला एक लिंक दिसेल. या लिंकवर जाऊन सर्वप्रथम तुम्हाला स्वत:ची नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला इतर तपशील भरावा लागेल. माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज शुल्काबाबत महत्वाची बाब लक्षात ठेवावी लागेल. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही. ही अर्ज प्रक्रिया सर्वांसाठी निशुल्क आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 56 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

16 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्या. भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठात नोकरी 

मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्या. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी या भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/2023-24/853, दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार सदर पदांकरीता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजण्याच्या आत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास तो बाद करण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या.