मुंबई : एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी भारतीय सेनेने फटकारलं आहे.
जम्मू काश्मिरमध्ये शहीद झालेले जवान हे मुस्लिम असल्याचं वक्तव्य ओवेसींनी केलं होतं. या वक्तव्यावर भारतीय सेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. शहिदांचा धर्म नसतो, त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. शहिदांच्या धर्मावर भाष्य करणाऱ्यांना भारतीय सेनेची पुरेशी माहिती नाही.
लेफ्टनंट यांनी सांगितलं की, जे अशी वक्तव्य देतात त्यांना भारतीय सेनेबद्दल काहीच माहिती नाही. दहशतवादी हल्ल्याला सोशल मीडिया देखील तितकाच जबाबदार आहे. शत्रू सध्या गोंधळेला आहे. तरूणांनी दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणं ही खूप चिंतेची बाब आहे.
दहशतवाद वाढण्यासाठी सोशल मीडिया देखील कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडियामुळे जास्त तरुणांपर्यंत पोहचणे शक्य झाले आहे. आता या समस्येवर मात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ मध्ये आम्ही दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनाच लक्ष केले आणि यात आम्हाला यश देखील आले, असे त्यांनी सांगितले.