या बॅंकेत तर नाही ना तुमची गुंतवणूक... ११००० कोटी बुडाले

देशातील सार्वजनीक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल १.७७ अरब डॉलरचा (सुमारे ११,३३० कोटी रूपये) घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 14, 2018, 03:10 PM IST
या बॅंकेत तर नाही ना तुमची गुंतवणूक... ११००० कोटी बुडाले title=

मुंबई : देशातील सार्वजनीक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल १.७७ अरब डॉलरचा (सुमारे ११,३३० कोटी रूपये) घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. ही रक्कम मुंबईतील एक शाखेतून झालेल्या अनधिकृत व्यवहारांशी संबंधीत असल्याचे बोलले जात आहे.

बीएसईकडे तक्रार

दरम्यान, अपहार झालेल्या रकमेपैकी निवडक रक्कम ही ज्या खात्यातून अपहार केला जायचा त्या खातेदारास आदा केली जायची. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बॅंक प्रशासनाने बॉम्बे स्टॉक एस्चेंज विभागाला (BSE) माहिती दिली आहे. या अफरातफरीचा परिणाम इतर बॅंकावरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅंकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

पीएनबीचा शेअर ८ टक्क्यांनी घसरला

दरम्यान, या अफरातफरीचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. या प्रकरणात थेट कोणाचे नाव अद्याप पुढे आले नाही. पण, चौकशी अंती सत्य बाहेर येईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण बाहेर येताच पीएनबीचा शअर्स ८ टक्क्यांनी घसरला आहे. ज्यात गुंतवणूकादारांचे ३००० कोटी रूपये बुडाले आहेत. बुधवारी सुरूवातीला व्यवहार सुरू झाला तेव्हा पीएनबीचा शेअर ५.७ टक्क्यांनी घसरला.

१४९ रूपयांपर्यंत घसरला शेअर

पीएनबीच्या फ्रॉड आणि बानावट व्यवहारांची बातमी येताच सकाळी ११.४८ वाजलेपासून स्टॉक ७.८२ टक्क्यांनी घसरून तो १४९ वर पोहोचला. दरम्यान, दुपारपर्यंत शेअर्स पुन्हा वधारण्यास सुरूवात झाली खरी. पण, त्याचा वेग फारच कमी होता. गेल्या आठवड्यात सीबीआयने म्हटले होते की, पीएनबीकडून तक्रार आल्यावर अब्जाधीश जूलर नीरव मोदी यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

दरम्यान, पीएनबीने जलर आणि इतरांवर ४.४ कोटी डॉलर्सचा अफहार केल्या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, यंत्रणा पुढील तपास करत आहेत.