Adani Enterprises FPO Calls Offs : अदानी समूहाने (Adani Group) आपली फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेची (Adani Enterprises) 20 हजार कोटींच्या ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ (Follow On Public Offer) अर्थात ‘एफपीओ’ (FPO) प्रक्रिया रद्द केली आहे. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. यादरम्यान आता अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन या गुंतवणूकदारांशी संवाद साधला असून ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्यामागील कारण सांगितलं आहे.
गौतम अदानी (Gautal Adani) यांनी पूर्पणणे सबस्क्राइब्ड FPO नंतर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण बाजारात होणारे चढ-उतार पाहता या विलक्षण परिस्थितीत FPO च्या प्रक्रियेत पुढे जाणे नैतिकदृष्टय़ा योग्य होणार नाही असं मत संचालक मंडळाने मांडलं.
गौतम अदानी यांनी सांगितलं आहे की, शेअर बाजारात होणारी हालचाल आणि चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं कंपनीचा हेतू आहे. यामुळे आम्ही FPO मधून मिळालेले पैसे परत करत अशून यासंबंधीचा व्यवहार बंद करत आहोत.
पुढे ते म्हणाले की, माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित प्राथमिकता आहे. यासाठी गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO प्रक्रिया मागे घेतली आहे. या निर्णयाचा आमचा सध्याचा कारभार आणि भविष्यातील योजनांवर काही फरक पडणार नाही.
#WATCH | After a fully subscribed FPO, yday’s decision of its withdrawal would've surprised many. But considering volatility of market seen yday, board strongly felt that it wouldn't be morally correct to proceed with FPO:Gautam Adani, Chairman, Adani Group
(Source: Adani Group) pic.twitter.com/wCfTSJTbbA
— ANI (@ANI) February 2, 2023
"एक उद्योजक म्हणून गेल्या चार दशकांच्या माझ्या प्रवासात माझे हितचिंतक आणि गुंतवणूकदारांच्या समूहाने मोठं समर्थन दिलं. मी आयुष्यात जे काही थोडं, जास्त मिळवलं आहे ते त्यांच्या विश्वासाच्या आधारेच आहे. मी माझ्या यशाचं सर्व श्रेय त्यांना देतो".
फॉलो-ऑन समभाग विक्रीला सेकंडरी ऑफरिंग म्हणूनही ओळखलं जातं. ही एक प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केलेली कंपनी विद्यमान भागधारकांना तसेच नवीन गुंतवणूकदारांना नवीन समभाग जारी करते.
अदानी एंटरप्रायझेसचा शेअर बुधवारी 28.50 टक्क्यांनी कोसळून 2128.70 रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसने 3112 ते 3276 रुपये किंमतीत शेअर्स विकले होते.
एफपीओ प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयानंतर अदानी समूहाने निवेदन प्रसिद्ध केलं होतं. यात सांगण्यात आलं होतं की, अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता एफपीओच्या माध्यमातून मिळवलेला निधी परत करत आहोत. तसंच पूर्ण झालेला व्यवहार मागे घेत आहोत. गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाचे उद्दिष्टाने हा निर्णय घेत आहोत.