भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित, WHO ची धक्कादायक माहिती

WHO आणि UN कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील तब्बल 16 लाख बालके लसिकरणापासून वंचित राहिले आहेत. याची कारणे काय हे समजून घेणार आहोत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 17, 2024, 02:07 PM IST
भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित, WHO ची धक्कादायक माहिती  title=

धक्कादायक बातमी बालकांच्या लसीकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित असल्याचं समोर आलं आहे. WHO, युनिसेफच्या संयुक्त अहवालातून ही माहिती समोर आलीय. गेल्या वर्षी कुठलीही लस न घेतलेल्या बालकांच्या संख्येत भारत दुस-या क्रमांकावर आहे. रोगप्रतिबंधक लसीकरणात जगभरात सातत्यानं घट होत आहे. गेल्या वर्षी जागतिक लसीकरण मोहीम ठप्प झाल्याचं WHO आणि युनिसेफनं संयुक्त अहवालात नमूद केलंय. लस न घेतलेल्या मुलांना गंभीर आजाराचा धोका शकतो, असं आरोग्य तज्ज्ञाचं मत आहे.

कुठलीही लस न घेतलेल्या बालकांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 21 लाख बालकं लसीकरणापासून वंचित राहिल्यामुळे नायजेरियाचा क्रमांक पहिल्या नंबरवर आहे. २०२१ च्या तुलनेत भारताच्या लसीकरणात सुधार झाला आहे. तरी देखील १६ लाख बालके या लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. तर जगभरातून तब्बल २७.३ लाख बालकांना एकही लस मिळालेली नाही. WHO आणि युनिसेफद्वारे ही आकडेवारी मांडण्यात आली आहे. 

नायजेरियामध्ये शून्य डोस असलेल्या मुलांची संख्या 2023 मध्ये सर्वाधिक 21 लाख होती. भारतानंतर इथिओपिया, काँगो, सुदान आणि इंडोनेशिया हे इतर देश आहेत.

लसीकरण कमी होण्याची काय कारणं आहेत हे समजून घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

  • भौगोलिक विषमता
  • शहरातील गरीबांपर्यंत लसीकरण पोहोचवण्यात अडचणी येतात 
  • ग्रामीण आणि दुर्गम भागात लसीकरण मोहीम पोहोचवण्यात अडचणी 
  • स्थलांतरामुळेही लसीकरण करण्यात अडचणी 
  • सामाजिक, आर्थिक कारणांमुळे लसीकरण होत नसल्याचं समोर 

जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना लसीकरण न झालेल्या आणि कमी लसीकरण केलेल्या मुलांना ओळखण्यासाठी उप-राष्ट्रीय स्तरावर अनुकूल दृष्टिकोनासह सर्व स्तरांवर प्रयत्नांना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आणि त्यांना लसीकरण केले जाऊ शकते. दक्षिण-पूर्व आशियासाठी डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद म्हणाल्या, "लसीकरण न झालेल्या आणि कमी लसीकरण झालेल्या मुलांची वाढती संख्या त्वरीत आणि जलद कारवाईची गरज आहे." ही मुले कुठे आणि का मागे राहिली आहेत हे शोधून त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

पुढे त्या म्हणाल्या की, 'जी बालके लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. त्या कोणत्याही बालकाला जीवघेणा किंवा घातक आजार होऊ नये.' तसेच 2030 च्या लसीकरण अजेंडा साध्य करण्यात भारत मागे पडत चालला आहे. 2023 मध्ये गोवर-विरोधी लसीचा (MCV1) पहिला डोस न मिळालेल्या मुलांची संख्या भारतात तिसऱ्या क्रमांकावर होती. हा आकडा जवळपास 16 लाख होता. MCV1 प्राप्त करणाऱ्या मुलांची टक्केवारी, 'सामान्यत: राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार नऊ किंवा 12 महिन्यांत', 93 टक्क्यांवर घसरली. हे प्रमाण 2019 च्या तुलनेत कमी आहे, जेव्हा हा आकडा 95 टक्के होता.