Indian Navy Day 2022 : भारतीयांसाठी 4 डिसेंबरचा दिवस खूप खास; जाणून घ्या आजच्या दिवसाचं महत्त्व

Indian Navy Day 2022 : भारतीय नौदलासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी असं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात. 

Updated: Dec 4, 2022, 07:46 AM IST
Indian Navy Day 2022 : भारतीयांसाठी 4 डिसेंबरचा दिवस खूप खास; जाणून घ्या आजच्या दिवसाचं महत्त्व title=
indian navy day 2022 know why navy day is celebrated on december 4 and know about operation trident nmp

Indian Navy Day 2022 : आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. अनेकांना माहिती आहे आजचा दिवस म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारतीय नौदलाने इतिहास घडवला होता. त्यामुळे भारतीय इतिहासात आजचा दिवस सोनेरी अक्षराने लिहला गेला आहे.  भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य गाजविणारा दिवस...आजच्या दिवशी भारतीय नौदलात अनेक कार्यक्रम केले जातात. 

का साजरा केला जातो Navy Day ​?

4 डिसेंबर म्हजेच आजच्याच दिवशी 1971 मध्ये यु्द्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला करुन तो उद्ध्वस्त केला होता.  1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा भारतीय नौदलाने इतिहासीक कामगिरी केली होती.  भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानच्या नौदलाचं तसंच हवाई दलाचं कंबरडं मोडलं.  परिणामी पाकिस्तानचे दोन तुकडे पडले आणि बांग्लादेश स्वातंत्र्य झाला. हा दिवस भारतीय नौदलासाठी खूप अभिमानाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. (indian navy day 2022 know why navy day is celebrated on december 4 and know about operation trident)
 

भारतीय नौदल दिन 2022 थीम

 दर

वर्षी नौदल दिन साजरा करण्यासाठी वेगळी थीम ठरवली जाते. यंदा भारतीय नौदल दिन 2022 ची थीम "स्वर्णिम विजय वर्ष" अशी आहे.

 

याचा दिवस यासाठी पण आहे खास

भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी कराचीमध्ये ऑपरेशन ट्रायडेंटवर विजय मिळवला होता. 

1945 पासून दुसऱ्या महायुद्धानंतर 1 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात होता. ही परंपरा 5 डिसेंबर 1972 पर्यंत पाळण्यात आली. त्यानंतर 1972 पासून फक्त 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात आहे.

भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. नंतर त्याला रॉयल इंडिया नेव्ही असं नाव देण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतीय नौदल अर्थाच इंडियन नेव्ही असं ठेवण्यात आलं. आजच्या दिवशी युध्द स्मारकाला पुष्प अर्पण केलं जातं आणि नंतर नौदलाच्या पाणबुडी, जहाजं आणि विमानांच्या ताकतीचं आणि कसरतींच प्रदर्शन करण्यात येतं.