77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!'

Indian Railway Ticket Price: एक जुनं तिकिट सोशल मीडियात व्हायरल होतंय. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान रेल्वे भाडं किती होतं याची माहिती मिळते. हे भाडं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 12, 2024, 10:34 AM IST
77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!' title=
भारत-पाकिस्तान रेल्वे भाडं

Indian Railway Ticket Price: सध्या भारत आणि शेजारील राष्ट्र पाकिस्तानातील संबंध फारसे चांगले नाहीत. पाकिस्तानातून वारंवार होत असलेली कुरघोडी याला कारणीभूत आहे. पाकिस्तानच्या धर्तीवर क्रिकेट सामने न खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. पाकिस्तानच्या खेळाडूं, अभिनेत्यांच्या भारतातील परफॉर्मन्सवर बंधने आहेत. पण 77 वर्षांपुर्वी असं वातावरण नव्हतं. भारत आणि पाकिस्तान दरम्यान ब्रिटीश काळात रेल्वेची निर्मिती झाली. काळासोबत दोन्ही देशांच्या रेल्वे प्रणालीत खूप मोठे बदल झाले आहेत. भारतीय रेल्वे नेटवर्क खूप मोठे आणि विस्तृत आहे तर पाकिस्तानमधील रेल्वेचे जाळे तुलनेत लहान आहे. सुरुवातील दोन्ही देशांमध्ये काही ट्रेन चालवल्या जायच्या. काही काळात त्या बंद करण्यात आल्या. आता ट्रेनने तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत. पण एक जुनं तिकिट सोशल मीडियात व्हायरल होतंय. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान रेल्वे भाडं किती होतं याची माहिती मिळते. हे भाडं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

रेल्वे सेवा 

आता तुम्ही भारत पाकिस्तान असा रेल्वे प्रवास करु शकत नाही. दोन्ही देशातील राजकीय तणाव आणि सुरक्षा ही प्रमुख कारणे आहेत. पण साधारण 77 वर्षांपुर्वी भारत-पाकिस्तान प्रवास सोपा होता. त्यावेळी दोन्ही देशात थेट रेल्वे सेवा होती.17 सप्टेंबर 1947 चे एक रेल्वे तिकिट चर्चेत आलंय. तेव्हा डिजिटलायझेशन नव्हतं. त्यामुळे तिकिटावर स्टॅम्प पेनने लिहिलंय.हे एसी कोचचं तिकिट असल्याचं पाहून लक्षात येतं.

इतक्या कमी रुपयात पाकिस्तान 

हे तिकिट पाकिस्तानाच्या रावळपिंडीतून भारतातील अमृतसरला येणारी ट्रेन होती. या तिकिटातून 9 प्रवासी प्रवास करत होते. तुमच्या अंदाजानुसार एकाचं तिकिट किती असेल? दहा,वीस,तीस रुपये असा अंदाज आपण लावू शकतो. पण तिकिट 36 रुपयांचं होतं, ज्यात 9 प्रवाशांनी प्रवास केला. याचा अर्थ एका प्रवाशाचं तिकिट अवघं  4 रुपये इतकं होतं. पाकिस्तान आणि भारतातील प्रवास इतक्या कमी किंमतीत होत असे. 17 सप्टेंबर 1947 रोजीच्या या तिकिटाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 

सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान रेल्वे सेवा बंद 

रावळपिंडी आणि अमृतसर दरम्यान साधारण पावणे तिनशे किलोमीटरचं अंतर आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानातील रेल्वे सेवा बंद आहे.भारतीय रेल्वे अंतर्गत शताब्दी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आमि मेल एक्सप्रेस सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे गाड्या धावतात. पाकिस्तानमध्येदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे गाड्या धावतात. पण त्यांची संख्या आणि प्रकार भारताच्या तुलनेत फार कमी आहे.