Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. रेल्वे भरती बोर्डाकडून एक भरती नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पदांची भरती आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 22, 2024, 12:31 PM IST
Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर  title=

Railway Para Medical Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्डाने पॅरा मेडिकलच्या 1376 रिक्त पदांसाठी भरतीचे निवेदन जाहीर केले आहे. इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या क्षेत्रानुसार निवेदन करु शकता. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. यासोबत कोणत्याही उमेदवाराला काही महत्त्वाचे बदल करायचे राहिले असतील तर ते 17 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत करेक्शन विंडो वर करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे निवेदन फक्त ऑनलाइन मोडवर स्वीकारलं जाणार आहे. 

या पदांवर रेल्वेत भरती 

फिल्ड वर्कर - 19 पदे 
लॅबोरेट्री असिस्टंट (ग्रेड -3) 94
ECG टेक्नीशियन - 13
ऑप्टोमेट्रिस्ट - 4
कारडिएक टेक्नीशियन - 4
स्पीच थेरेपिस्ट - 1
रेडियोग्राफर एक्स रे टेक्नीशियम - 64
फार्मासिस्ट (एंटी ग्रेड) - 246
कॅथ लॅबोरेट्री टेक्निशियन - 2
ऑक्युपेशनल थेरेपिस्ट - 2
फीजियोथेरेपिस्ट (ग्रेड-2) - 20
परफ्युश्निस्ट 2
लॅबोरेट्री सुप्रीटेंडेट - 27
हेल्थ ऍण्ड मलेरिया इंस्पेक्टर (ग्रेड - 3) -126
डायलिसिस टेक्नीशियन - 20
डेंटल हायजीनिस्ट - 3
क्लीनिकल सायकोलॉजिस्ट - 7
ऑडियोलॉजिस्ट ऍण्ड स्पीच थेरेपिस्ट - 4 
नर्सिंग सुप्रिटेंडेंट - 713
डायटिशियन - 43

वयोमर्यादा आणि प्रक्रिया 

भरतीसाठी निवेदन करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्षे असणे आवश्यक आहे. सर्व वेगवेगळ्या पदांसाठी आयुमर्यादा वेगवेगळी आहे. ज्याची तपशीलवार माहिती ही अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे. आरक्षित श्रेणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वेगळी आहे. तसेच या पदाची भरती देखील ऑनलाइन घेण्यात येणार आहे. जे उमेदवार ऑनलाइन परिक्षा पास करतील त्यांना मेडिकल चाचणीकरता बोलावलं जाणार आहे. मेडिकल परिक्षण पास करणारे उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. 

निवेदन शुल्क 

सामान्य श्रेणीत येणाऱ्या लोकांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच SC/STS/EWC/PwBD/ मागास वर्ग आणि इतर आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांकडून 250 रुपये आकारले जाणार आहे. शुल्क फक्त ऑनलाइन आकारले जाणार आहे. अन्य कोणत्याही पद्धतीने शुल्क आकारले जाणार नाही. निवेदनाची संपूर्ण PDF येथे क्लिक करा. जे कोणतेही उमेदवार रेल्वे पॅरा मेडिकल पदांसाठी भरतींसाठी निवेदन करत असाल तर विशेष काळजी घेतली जाणार आहे. क्षेत्रानुसार, वेगवेगळ्या पदानुसार, वयोमर्यादा आणि एलिजिबिलिटीकरता अधिकृत वेबसाइटवर पाहणे आवश्यक आहे.