स्लीपर क्लासच्या दरांत AC प्रवास, मुंबईतून निघणाऱ्या या ट्रेनमध्ये 3 टिअर इकोनॉमी कोच

भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे.

Updated: Oct 5, 2021, 10:41 AM IST
स्लीपर क्लासच्या दरांत AC प्रवास, मुंबईतून निघणाऱ्या या ट्रेनमध्ये 3 टिअर इकोनॉमी कोच title=

मुंबई : भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे. या क्रमात आता 7 ट्रेनमध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोच लावण्यात येणार आहे. नवीन एसी कोचमध्ये कन्वेशनल एसी थ्री - टिअर कोचमध्ये 72 ऐवजी 83 सीट्स असणार आहेत. या कोचसाठी टिकिट दर सामान्य एसी थ्री टिअर कोचपेक्षा कमी असतो.

या ट्रेन्समध्ये लागणार स्वस्त एसी डबे
1  गोरखपूर-कोचुवेली एक्स्प्रेस
2 गोरखपूर - सिकंदराबाद एक्स्प्रेस
3 गोरखपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस
4 लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)-गोरखपूर एक्स्प्रेस
5 LTT - वाराणसी एक्स्प्रेस
6 LTT - छपरा एक्स्प्रेस
7 LTT - फैजाबाद एक्स्प्रेस

स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी सुविधा
स्लीपर क्लासच्या प्रवाशांना AC कोचकडे आकर्षित करण्यासाठी नवीन AC इकोनॉमी क्लासचे कोच तयार करण्यात आले आहेत. याचा उद्देश त्या लोकांना एसी प्रवास उपलब्ध करून द्यायचा आहे. जे महागड्या भाड्यामुळे एसीचे टिकिट बुक करीत नाही. एसी इकोनॉमी क्लासचे भाडे एसी 3 कोचपेक्षा 8 ते 10 टक्के कमी आहे.

नवीन फीचर्स
नवीन AC3 इकोनॉमी कोच (एसी 3 इकोनॉमी क्लास)मध्ये अनेक आधुनिक फीचर्स जोडण्यात आले आहे. नवीन कोचेस मध्ये 2 सीट्मधील गॅप तेवढाचा ठेवण्यात आला आहे. कोचच्या इंटेरिलअल डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक सीटच्या प्रवाशांसाठी एसी डक वेगवेगळा बनवण्यात आला आहे. यासोबतच सीटसाठी बॉटल स्टॅड, रिडिंग लाईट आणि चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.