यासाठी भारतीय रेल्वे देणार तुम्हाला १ लाख रुपये

भारतीय रेल्वेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2018, 03:35 PM IST
यासाठी भारतीय रेल्वे देणार तुम्हाला १ लाख रुपये title=

मुंबई : भारतीय रेल्वेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे.

फोटोग्रॉफीचा शौक असणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने एक खूशखबर आणली आहे. भारतीय रेल्वेशी संबंधित फोटो घेणाऱ्या फोटोग्राफरला १ लाख रुपये मिळणार आहेत. भारतीय रेल्वेने सुंदर फोटोसाठी १ लाखाचं बक्षीस ठेवलं आहे. रेल्वेला हे फोटो २६ जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. सुंदर फोटोला रेल्वेकडून १ लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

रेल्वेने या स्पर्धेची 26 जानेवारीला केली होती. 26 फेब्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे फोटो पाठवू शकता.या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी MyGov.in वर अकाउंट बनवणं अनिवार्य आहे. तुमची एन्ट्री मिळाल्यानंतर याच अकाउंटवरुन तुम्हाला रेल्वे संपर्क करणार आहे. निवडले गेलेले फोटो रेल्वे प्रदर्शनात ठेवणार आहेत. रेल्वे त्यांच्या वेबसाईट आणि सोशल अकाऊंट देखील ते शेअर करणार आहे. 

तुमच्या फोटोसह हा फोटो तुम्हाला पाठवायचा आहे. फोटोची जागा, स्टेशन आणि डिविजन याची माहिती देणे अनिवार्य आहे. चालत्या रेल्वेतून किंवा दरवाज्यावर उभे राहून काढण्यात आलेले फोटो रिजेक्ट केले जातील.

फोटीची साईज 2 एमबी पेक्षा अधिक नसावी. जर तुमच्याकडे DSLR नसेल तर तुमच्या स्मार्टफोनमधून देखील तुम्ही फोटो शेअर करु शकता. फोटो ओरिजिनल असावा. फोटोशॉप किंवा एडिटींग केला नसावा.